सीरम इन्स्टिट्यूट मध्ये होणार ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प

कोरोना साथीमध्ये वैद्यकीय ऑक्सीजनच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर ऑक्सीजन निर्मितीकरिता सीरम इन्स्टिट्यूटने पुढाकार घेतला आहे.
Oxygen Production
Oxygen ProductionSakal

पुणे - कोरोना (Corona) साथीमध्ये वैद्यकीय ऑक्सीजनच्या (Oxygen) तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर ऑक्सीजन निर्मितीकरिता सीरम इन्स्टिट्यूटने (Serum Institute) पुढाकार घेतला आहे. दररोज २०० कोरोना रुग्णांना पुरेल अशा वैद्यकीय उपयोगाच्या ऑक्सिजन सिलिंडर निर्मितीचा प्रकल्प पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये कार्यान्वित करण्यात आला आहे. हे सिलिंडर रुग्णालयांना (Patient) विनामूल्य उपलब्ध करून दिले जाणार आहेत, अशी माहिती इन्स्टिट्यूटच्या वतीने देण्यात आली आहे. (Oxygen production project to be held at Serum Institute)

सिरम इन्स्टिट्यूटचा हा सामाजिक पुढाकार असून पुण्यातीलच प्रायमूव्ह इंजिनियरिंग कंपनीने युद्धपातळीवर विक्रमी वेळेत म्हणजे फक्त १२ दिवसात हा प्रकल्प साकारला आहे. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या कॉम्प्रेसरसारख्या गोष्टी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून आणण्यापासून कस्टम क्लीअरन्स, एफडीए परवानगी, पेट्रोलियम आणि विस्फोटक सुरक्षा संस्थांच्या परवानग्या, प्रत्यक्ष प्रकल्पाची उभारणी या गोष्टी फक्त १२ दिवसात पूर्ण केल्या आहेत. आदर पूनावाला यांच्या मार्गदर्शनाखाली सीरम इन्स्टिट्यूटने या सर्व प्रकल्पाचा खर्च उचलला आहे.

Oxygen Production
विद्यार्थ्यांचे शिक्षण डावलणाऱ्या शाळांविरोधात पालकांचे आंदोलन

वैद्यकीय क्सीजनची निर्मिती

- आयएस कोड आणि एफडीए मानकांनुसार आवश्यक वैशिष्ट्यांसह ९३ टक्क्यांपेक्षा जास्त शुद्धतेचा ऑक्सिजन

- दीडशे बारच्या दाबाने सिलिंडर्समध्ये ऑक्सिजन भरला जातो

- एका सिलिंडरमध्ये सात हजार लिटर ऑक्सिजनची क्षमता असते.

- प्रायमूव्ह इंजिनियरिंगने पेलले आव्हान

गॅस हाताळणे हे प्रायमूव्हचे प्रारंभापासूनच प्राथमिक क्षेत्र आहे. प्रायमूव्ह एलपीजी, प्रोपेन आणि सीएनजी क्षेत्रात सक्रिय आहेत. ऑक्सिजनच्या संकटावर मात करण्यासाठी रुग्णालयांना पाठबळ देण्याची आदर पूनावाला यांची होती. सीरमचे संचालक केदार गोखले यांनी हा प्रकल्प घडवून आणण्यासाठी संपूर्ण टीमला प्रेरित केले.

- राजेश दाते, प्रायमूव्ह कार्यकारी संचालक

वॉर्प स्पीड टेक्नॉलॉजी डिप्लॉयमेंटचे उत्तम उदाहरण हा प्रकल्प आहे. हे उदाहरण बघून पुणे विभागात लवकरच ऑक्सिजन आत्म निर्भर होण्यासाठी असे अनेक प्रकल्प राबविण्यात येतील.

- डॉ.आशिष लेले, एनसीएलचे संचालक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com