पंतप्रधानांना 'सैनिक फ्लॅग' लावण्याचा मान पंढरपूरच्या वीरकन्येला!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 डिसेंबर 2019

वीरकन्या उमंग हिच्या हस्ते भारतीय जवानांच्या अलौकिक कार्यास सलाम असणारा सैनिक फ्लॅग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लावण्यात आला.​

पंढरपूर : सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलनाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंढरपुरचे सुपुत्र शहीद मेजर कुणाल गोसावी यांची कन्या उमंग गोसावी हिच्या हस्ते शनिवारी (ता.7) करण्यात आला. पुण्यातील राजभवन येथे भारतीय लष्कर ध्वजदिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे येथे शनिवारपासून देशातील पोलीस महासंचालक यांच्या राष्ट्रीय पातळीवरील तीन दिवसीय परिषद भरविण्यात आली आहे. त्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. यानिमित्ताने सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलन कार्यक्रमासाठी पंढरपूर येथील मरणोत्तर शौर्यचक्र प्राप्त शहीद मेजर कुणाल गोसावी यांचे वीरपत्नी उमा गोसावी आणि त्यांची कन्या उमंग गोसावी यांना निमंत्रित करण्यात आले होते.

- INDvWI : 'सर, तुमचा डायलॉग आवडला'; बिग बींच्या ट्विटला विराटचे उत्तर!

यावेळी वीरकन्या उमंग हिच्या हस्ते भारतीय जवानांच्या अलौकिक कार्यास सलाम असणारा सैनिक फ्लॅग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लावण्यात आला. यावेळी तिचे अभिवादन पंतप्रधान मोदी यांनी केले.

- तर, मला वेगळा विचार करावा लागेल; खडसेंचा बंडाचा पवित्रा

पंतप्रधान मोदी यांनी वीरकन्या उमंग गोसावी हिच्या हस्ते सैनिक कल्याण निधीला आर्थिक मदत करीत सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलन शुभारंभ केला. कर्नल जाधव यांनी उमंग हिच्या हस्ते पंतप्रधान मोदी यांना स्मृतीचिन्ह देण्यात आले.

- महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी समन्वयाची जबाबदारी छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदे यांच्यावर

यावेळी वीरपत्नी श्रीमती उमाताई गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते. या निधीचा उपयोग सैनिक कल्याणकारी योजनेसाठी करण्यात येतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pandharpur Umang Gosavi got the honor to gave Soldier Flag to PM Narendra Modi