
पुणे : शाळा पुन्हा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेणं, हे सध्या सरकार, प्रशासकीय यंत्रणा यासमोरील सगळ्यात मोठं आव्हान मानले जात आहे. परंतु अशातच राज्य सरकारने शाळा सुरू करण्याच्या निर्णय जुलैपर्यंत पुढे ढकलला आहे. मात्र, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लस येत नाही, तोपर्यंत शाळा सुरू करू नयेत, अशी पालकांची धारणा असून त्यासंदर्भात आता पालकांनी ऑनलाईन तक्रार दाखल करण्यास सुरवात केली आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
शाळा सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकार, प्रशासकीय यंत्रणा, शाळा स्तर, शिक्षणाधिकारी अशा विविध स्तरात सातत्याने चर्चा होत आहेत. त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर "कोरनावर लस येत नाही, तोपर्यंत शाळा सुरू नकोत', याबाबत पॅरेंटस् असोसिएशनच्या वतीने "चेंज डॉट ओआरजी'च्या सहाय्याने ऑनलाईन चळवळ सुरू करण्यात आली आहे. याला मंगळवारी दुपारपर्यंत जवळपास सव्वा चार लाख पालकांनी पाठिंबा दर्शविला आहे.
प्रवाशांच्या गर्दीने रेल्वे स्थानक पुन्हा गजबजले
नुकताच लॉकडाऊन 4.0 संपला असून आता अनलॉक 1.0 सुरू झाला आहे. तसेच राज्य सरकारने शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय जुलैपर्यंत पुढे ढकलला आहे. मात्र, या ऑनलाईन चळवळीद्वारे देशभरातील लाखो पालकांनी कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे थांबला नसतानाही, शाळा पुन्हा सुरू करण्याला विरोध दर्शविला आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ठोस औषध किंवा लस येत नाही, तसेच संपूर्ण परिस्थिती सुरळीत होत नाही, तोपर्यंत शाळा सुरू करण्यात येऊ नये, असे मत पालकांनी या चळवळीद्वारे मांडले आहे.
आदिवासींना महिलांच्या चेहऱ्यावरील हसू सांगतय, डोक्यावरील हंडा उतरल्याचे सुख
पालक म्हणतात :
"कोरोनाचा संसर्ग अद्याप अटोक्यात आलेला नाही. त्यावर कोणतेही ठोस औषध किंवा लसही उपलब्ध नाही. त्यामुळे जुन असो किंवा जुलै शाळा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेऊ नये. शाळा सुरू करण्याचा निर्णय जुलैपर्यंत पुढे ढकलला असला तरीही सरकारने त्याबाबत बारकाईने विचार करावा. आणि कोरोनावर औषध किंवा लस उपलब्ध होत नाही, तोपर्यंत शाळा सुरू करण्याचा विचार करू नये,''
- अंकुश पवार, पालक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.