पुणेकरांनो, मॉर्निंग वॉकसाठी उद्याने खुली होणार; पण 'यांना' नो एन्ट्री!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जून 2020

पुण्यातील लक्ष्मी रस्ता, टिस्क रस्ता, जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन स्त्यांवरील दोन्हीऐवजी एकाच बाजूचे दुकाने सुरू राहण्याची शक्यता आहे.

पुणे : पुणेकरांनो, तुम्हाला आता रोज मॉर्निक वॉकसाठी घराबाहेर म्हणजे उद्याने, मैदानावर मोकळेपणाने जाता येणार आहे. त्यासाठी पुण्यातील १९९ पैकी दीडशे उद्याने मंगळवारपासून (ता.२) खुली होणार आहेत. मात्र, बाधित क्षेत्रातील उद्याने बंद राहतील. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना उद्यानात प्रवेश नसेल.

- पुणेकरांनो सावधान : पुढचे चार दिवस धोक्याचे, हवामान खात्यानं दिलाय इशारा

दुसरीकडे मात्र, मॉल, मल्टिप्लेक्स, रेस्टॉरंट, धार्मिकस्थळे पुढील काही दिवस बंद राहतील. उद्यानात मॉर्निंग वॉकसाठी पहाटे पाच ते सायंकाळी सात या वेळेत परवानगी राहणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे. मात्र, सार्वजनिक हिंडल्या- फिरणाऱ्यांना मास्कसह सुरक्षिततेची साधने बाळगावी लागतील. मात्र, राज्य सरकारच्या आदेशानुसार पुण्यातील लॉकडाउनच्या नव्या स्वरूपाची घोषणा सोमवारी (ता.१) करणार आहोत, असे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले.

- पैसे गेले अन् गाडीही सुटली; परराज्यातील कामगारांवर भामट्यांमुळे आली ही वेळ!

राज्यातील लॉकडाउनच्या पाचव्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी सरकारची भूमिका मांडली. तेव्हा या टप्प्यातील पुण्यात नव्याने कोणती दुकाने उघडणार? बाधित आणि सूक्ष्म बाधित क्षेत्रांसाठी काय निबंध असतील? त्याशिवाय, सरकारी, निमसरकारी कार्यालये आणि शाळा-कॉलेज सुरू होतील का? त्याची उत्सुकता आहे. मात्र, ज्या पद्धतीने मुख्यमंत्री ठाकरे यांनी आकड्यांनिशी आपली भूमिका जाहीर केली; त्याअर्थी पहिल्या टप्प्यात उद्याने, बाग आणि मैदाने सगळ्यांसाठी खुली होणार आहेत. लॉकडाउनच्या पहिल्या टप्प्यापासून शहरातील सर्व उद्याने बंद आहेत. 

- Big Breaking : अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द; मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली घोषणा!

गायकवाड म्हणाले, "राज्य सरकारच्या आदेशानुसार पुणे शहरासाठीही नवे आदेश काढण्यात येणार आहेत. ज्यात बाधित आणि सूक्ष्म बाधित क्षेत्रांसाठी नेमक्या कोणत्या उपाय योजना करायच्या? याचे नियोजन करीत आहोत. त्याची घोषणा केली जाईल. नव्या निर्णयांबाबत पोलिसांशीही चर्चा करण्यात येईल.

दरम्यान, पुण्यातील लक्ष्मी रस्ता, टिस्क रस्ता, जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन स्त्यांवरील दोन्हीऐवजी एकाच बाजूचे दुकाने सुरू राहण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांचाही निर्णय सोमवारीच घेतला जाणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: parks in Pune will be open from Tuesday 2nd June