पुण्यात अडकलेले विद्यार्थी घरी जाणार; 'अशी' केली भाजप, मनसेने मदत

Parties and organizations rushed to help the students stuck in pune during lockdown.jpg
Parties and organizations rushed to help the students stuck in pune during lockdown.jpg

पुणे : पुण्यात अकडून पडलेल्या विद्यार्थ्यांना स्वगृही पाठविण्यासाठी राज्य शासनाकडून मोफत बसची सुविधा होत नसल्याने अखेर राजकीय पक्ष व संघटनांनी पुढाकार घेतला आहे. शनिवारी (ता.9) भाजपतर्फे नाशिक, कोल्हापूर आणि सांगली साठी बस सोडल्या. तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने (मनविसे) जळगावला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बसचे पैसे भरले आहेत. रविवारी सकाळी या बस सोडल्या जाणार आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

लॉकडाऊन काळात पुण्यात हजारो विद्यार्थी अकडून पडले आहेत. या विद्यार्थ्यांचे जेवणाचे हाल होत आहेत. मानसिक तणावाखाली असल्याने गावाकडे पाठविण्याची मागणी केली जात आहे. गुरूवारी पुण्यातून 16 विद्यार्थ्यांना घेऊन एक एसटी बस नगरला गेली. मात्र, त्यानंतर अद्याप एकही एसटी बस गेलेली नाही. राज्य सरकारने कोटातील विद्यार्थ्यांची मोफत प्रवासाची सोय केली तशीच पुण्यातील विद्यार्थ्यांची करावी अशी मागणी होत आहे. मात्र, अद्याप तसे आदेश सरकारने दिलेले नसल्याने हे विद्यार्थी अडकून पडले आहेत.

आणखी वाचा - पुण्यात आयटी कंपन्यांमध्ये सुरू झाली पगार कपात 

"विद्यार्थी मजूरांची अडचन लक्षात घेऊन भाजपने "घर चलो अभियान' सुरू केले आहे. यात कोथरूड येथून दोन दिवसांपूर्वी 150 मजुरांना घेऊन पाच बसेस तेलंगनात गेल्या आहेत. आज वडगाव येथून नाशिक, कोल्हापूर आणि सांगलीला तीन बसमधून विद्यार्थी व मजूर पाठवून देण्यात आले आहेत. भाजपकडे 1 हजार जणांचे नावे असून, यात बहुतांश विद्यार्थी आहेत. पोलिसांकडून परवानगी घेऊन त्यांना गावाकडे पाठविले जाईल. ही सेवा कोल्हापूर, सांगली, औरंगाबाद, नाशिक, सोलापूर येथे असणार आहे, असे शहर सरचिटणीस राजेश पांडे यांनी सांगितले.

आणखी वाचा - मुंबई-पुण्यात पसरली अफवा; वाचा सविस्तर बातमी

मनविसेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव म्हणाले, "सरकारला विद्यार्थ्यांच्या मोफत प्रवासाची व्यवस्था करण्यास वेळ नाही, त्यामुळे जळगाव येथील 40 विद्यार्थ्यांना घरी सोडण्याची जबाबदारी घेतली आहे. यासाठी एसटी महमंडळाकडे 70 हजार रुपये जमा केले आहेत. रविवारी सकाळी हे विद्यार्थी पुण्यातून बाहेर पडतील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com