पुण्यातल्या ढगाळ वातावरणाचं कारण आहे 'पवन'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दबाचा क्षेत्राची तीव्रता वाढली आहे. यामुळे गुरूवारी (ता. 5) पहाटे साडे पाच वाजता कमी दाबाच्या क्षेत्राचे पवन चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. या चक्रीवादळाची तीव्रता पुढील 12 तास तशीच कायम राहणार आहे.

पुणे - अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दबाचा क्षेत्राची तीव्रता वाढली आहे. यामुळे गुरूवारी (ता. 5) पहाटे साडे पाच वाजता कमी दाबाच्या क्षेत्राचे पवन चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. या चक्रीवादळाची तीव्रता पुढील 12 तास तशीच कायम राहणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, याच समुद्रात आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. हे दुसरे कमी दाबाचे क्षेत्र मुंबई किनारपट्टीपासून दक्षिण पश्‍चिमेला 710 किमी आणि पणजी पासून 680 किमी अंतरावर पश्‍चिमेला आरबी समुद्रात आहे. यामुळे कालपासून मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यातील काही भागांमध्ये ढगळ वातावरण निर्माण झाले आहे. पुण्यातही ढगाळ वातावरण अनुभवायला मिळत आहे.  

महत्त्वाची बातमी :  'असा' आहे मुंबईमध्ये उभारला जाणारा बाळासाहेब ठाकरेंचा 9 फुटी पूर्णाकृती पुतळा..

परिणामी पुणे शहरातील थंडी कमी झाली आहे. शिवाय शहरात काही ठिकाणी हलक्‍या पावसाने हजेरी लावली होती. आगामी दोन दिवसातही शहरातील वातावरण कोरडे राहण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 

‘नागरिकत्व दुरुस्ती’ येऊन ठेपली आता संसदेच्या वेशीवर

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार या वर्षी उत्तर हिंदी महासागरामध्ये एकूण 11 चक्रावात (सायक्‍लॉनिक डिसटर्बन्स) निर्माण झाले होते. त्यातील 4 बंगालचा उपसागरात आणि 7 अरबी समुद्रात निर्माण झाले. निर्माण झालेल्या या 11 चक्रावातांचे 8 चक्रीवादळांत (बंगालच्या उपसागारात 3 चक्रीवादळ आणि अरबी समुद्रात 5 चक्रीवादळ) आणि तीन कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये (बंगालच्या उपसागारात 1 कमी दाबाचा क्षेत्र आणि अरबी समुद्रात 2 कमी दाबाचे क्षेत्र) रूपांतर झाले होते. 

हेही वाचा : हजाराची नोट येणार, दोन हजारांची जाणार ?

थंडी पळून गेली !
पुणे शहरात सध्याचे वातावरण ढगाळ असून, काही ठिकाणी हलक्या पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार येत्या दोन ते तीन दिवसांनंतर शहरातील वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे. या वर्षी बंगालचा उपसागराच्या तुलनेत अरबी समुद्रात जास्त चक्रीवादळं तयार झाली आहेत. त्यामुळं महाराष्ट्रातील वातावरण विचित्र झाले आहे. 

श्रीलंकेने दिले वादळाला नाव
अरबी समुद्रात सध्या घोंघावत असलेल्या चक्रीवादळाला 'पवन' हे नाव श्रीलंका या देशाने दिले आहे. पवन चक्रीवादळाचा प्रवास दक्षिण पूर्वेला असलेल्या सोमालियाचा दिशेनी असेल व पुढील १२ तासांमध्ये या चक्रीवादळाचा प्रभाव कमी होत त्याची पुन्हा कमी दाबाच्या क्षेत्रात निर्मिती होण्याची शक्यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pawan cyclone in arabian sea update information in marathi