esakal | पिंपरी-चिंचवडमधील 'या' 15 रस्त्यांवर 'पे ऍन्ड पार्क'

बोलून बातमी शोधा

Pay and Park at this15 Street in Pimpri Chinchwad

शहरातील सार्वजनिक वाहनतळ धोरणास (पार्किंग पॉलिसी) ला पालिकेच्या स्थायी समिती आणि महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने यापूर्वीच मान्यता दिली आहे. या धोरणानुसार, वाहनतळांच्या सुधारित दरांना सर्वसाधारण सभेत नुकतीच मान्यता देण्यात आली. हे धोरण राबविण्यासाठी पालिकेकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रथमच वापर केला जाणार आहे. यापूर्वी, या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा दिल्ली, बेंगलोर, चेन्नई येथे वापर करण्यात आला आहे. 

पिंपरी-चिंचवडमधील 'या' 15 रस्त्यांवर 'पे ऍन्ड पार्क'

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : शहरातील मुंबई-पुणे रस्त्यासह एकूण 15 रस्त्यांवरील "पे ऍन्ड पार्क' धोरण राबविण्यासाठी महापालिकेकडून सेन्सर्सवर आधारित आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रथमच वापर केला जाणार आहे. याअंतर्गत, विशिष्ट प्रकारचे पार्किंग ऍप विकसित केले जाणार असून त्याने वाहनचालकांना वाहने उभी करण्यासाठी मोकळ्या जागांची माहिती होणार आहे. तसेच स्वतःच्या वाहनासाठी जागा राखीव ठेवणे शक्य होणार आहे. 'स्मार्ट सिटी'च्या एबीडी क्षेत्रातील पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव या भागांमधील वाहनतळांसाठी सुमारे 350 सेन्सर्स बसविण्याचे प्रस्तावित आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरातील सार्वजनिक वाहनतळ धोरणास (पार्किंग पॉलिसी) ला पालिकेच्या स्थायी समिती आणि महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने यापूर्वीच मान्यता दिली आहे. या धोरणानुसार, वाहनतळांच्या सुधारित दरांना सर्वसाधारण सभेत नुकतीच मान्यता देण्यात आली. हे धोरण राबविण्यासाठी पालिकेकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रथमच वापर केला जाणार आहे. यापूर्वी, या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा दिल्ली, बेंगलोर, चेन्नई येथे वापर करण्यात आला आहे. 

आश्चर्य ! 'या' प्राण्याला ऑक्सिजनची गरजच नाही !

बीआरटीएस (स्थापत्य) प्रवक्ते विजय भोजने म्हणाले,""शहरातील एकूण 15 रस्त्यांवर हे 'पे ऍन्ड पार्क' धोरण राबविले जाणार आहे. त्यासाठी विशिष्ट प्रकारचे "पार्किंग ऍप' आणि सेन्सर्सवर आधारित आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. प्रत्येक वाहनचालकाने हे पार्किंग ऍप डाऊनलोड केल्यावर त्याला या रस्त्यांवरील मोकळी जागा कुठे आहे याची माहिती होऊ शकणार आहे. तसेच त्याला वाहन उभे करण्यासाठी जागा राखून ठेवणे शक्‍य होणार आहे. ठेकेदाराकडून वाहनतळासाठीचे शुल्क ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहे. वाहनतळांसाठी रस्त्याला समांतर असलेल्या जागा निश्‍चित केल्यावर सुरुवातीला स्मार्ट सिटीमधील पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव या एबीडी क्षेत्रात ठेकेदाराच्या खर्चाने सुमारे 350 सेन्सर्स बसविले जाणार आहेत. जोड रस्ते, शाळा, दवाखाने, सोसायट्यांचे प्रवेशद्वारे हे भाग वाहनतळ धोरणातून वगळण्यात आले आहेत.'' 

नोबेल हॉस्पिटल उडविण्याची धमकी देण्यामागे 'हे' आहे कारण

या रस्त्यांवर 'पे ऍन्ड पार्क' होणार 
मुंबई-पुणे महामार्ग, भक्ती-शक्ती ते गंगानगर, निगडी चौक ते बिग इंडिया, थेरगाव ते लिंक रस्ता, थेरगाव ते प्रसूनधाम सोसायटी रस्ता, चिंचवडगाव ते भोंडवे कॉर्नर, हिंजवडी ते चिंचवड स्टेशन, चिंचवड स्टेशन ते केएसबी चौक, काळेवाडी फाटा ते एम्पायर इस्टेट, एम्पायर इस्टेट ते देहू-आळंदी रस्ता, निगडी-मोशी (स्पाईन रोड), कासारवाडी ते वाकड, सांगवी ते किवळे, नाशिक फाटा ते मोशी, टेल्को रस्ता. 

डॉक्टरकडुन 75 लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या मनोज अडसुळ यास अखेर अटक

वाहन तळाचे प्रति तासाचे सुधारित दर - 
दुचाकी, रिक्षा - प्रत्येकी 5 रुपये, चारचाकी 10 रुपये, टेम्पो-चारचाकी मिनी ट्रक 15 रुपये, मिनी बस 25 रुपये, खासगी बस व ट्रक/ ट्रेलर प्रत्येकी 100 रुपये.