शस्त्रासह पोलिस अधिक्षकांचा फोटो व्हायरल; कारवाई होणार?

Photo of a police officer with a weapon goes viral
Photo of a police officer with a weapon goes viral

पुणे : पोलिस विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना सोशल मिडियावर शस्त्र घेतलेले फोटो शेअर न करण्याचा आदेश आहे. मात्र, काही पोलिस अधिकारी याला जूमानत नसल्याचे चित्र सोशल मिडियावर दिसते आहे.
 

 
 

शस्त्र घेऊन सोशल मिडियावर हिरोगिरी करणे, शस्त्र हातात घेतलेले फोटो व्हायरल करणे, प्रोफाइल पिक्चर ठेवणे, हे काही पोलिस अधिकाऱ्यांना चांगलेच महागात पडले होते. राज्याचे पोलीस महासंचालक दत्तात्रय पडसलगीकर यांनी तसा आदेश काढून पोलिस विभागातील अधिकारी ते पोलिस कर्मचाऱ्यांना हातात शस्त्र घेतलेले फोटो टाकण्यासंबंधी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र, तो आदेश अधिकारी पाळत नसल्याचं पुन्हा एकदा समोर आले.

पुणे : मार्केटयार्डात किन्नू संत्र्यांचा हंगाम सुरू

हर्ष पोद्दार हे बीडचे सध्याचे पोलीस अधिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या फेसबूक प्रोफाईला हातात एके 47 गन घेतलेला साध्या वेशातला फोटो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत येतोय. हा फोटो त्यांनी फेसबुकचा प्रोफाईल फोटो म्हणून ठेवला आहे. एखाद्या व्यक्तीने हातात शस्त्र घेऊन फोटो अथवा व्हीडीओ शेअर केला तर, त्यांच्यावर कारवाई होते. मात्र, पोलिस विभागातील अधिकाऱ्यांना सूचना अथवा आदेश असतानासुद्धा ते जूमानत नसल्याचं स्पष्ट होतंय.

Video : चिंचवडमध्ये बर्निंग कारचा थरार

पोलिस विभागात उच्च पदस्थ अधिकारी अशा प्रकारे शस्त्रप्रदर्शन करत असतील तर, मग ते कोणत्या कारणासाठी करत आहेत?  असा प्रश्न इथं उपस्थित होतो. हर्ष पोद्दार यांनी तर, परदेशात कायद्याची उच्च पदवीही घेतली आहे. त्यांच्या कार्यामूळे त्यांना "महाराष्ट्रीयन ऑफ द इअर' पुरस्कार ही प्राप्त झाला आहे. कायद्याचे शिक्षण घेतले असतानासुद्धा अथवा पोलीस अधिक्षक म्हणून अशा प्रकारचे फोटो टाकणं योग्य आहे का ? हर्ष पोद्दारांना पदाची दहशत दाखवायची का ?  असे एक ना अनेक प्रश्न निर्माण होतात. 

जनतेच्या मनातील पोलिस विभागाची बिघडत चाललेली प्रतिमा, त्यातच उच्च दर्जाच्या पोलिस अधिकाऱ्यांनी असे फोटो शेअर करून, नियम धाब्यावर बसवून पदाचा गैरवापर करणे हे मात्र, पोलिस विभागासाठी चिंताजनक आहे. त्यामूळे सोशल मीडियात अशा प्रकारचे फोटो शेअर करणाऱ्या कर्मचारी व अधिकारी यांच्यावरती आता पोलिस विभाग काय कारवाई करणार ? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com