पिंपरी चिंचवड महापालिकेला मिळणार महिला महापौर; यांना मिळणार संधी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

विद्यमान महापौर राहुल जाधव यांचा कार्यकाल २२ नोव्हेंबरला संपुष्टात येत आहे. महापालिका निवडणूक फेब्रुवारी २०२२ मध्ये अर्थात दोन वर्षांनी आहे. यापूर्वी भाजपने दोन नगरसेवकांना महापौर पदाची संधी दिली आहे. त्यामुळे आगामी काळात दोन नगरसेविकांना महापौर पदावर संधी मिळू शकते. 

पिंपरी : उद्योग नगरी पिंपरी चिंचवडच्या महापौर पदाचे आरक्षण महिलांसाठी खुले झाले आहे. त्यामुळे आगामी महापौर कोण याची चर्चा सुरू झाली आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे ७७ नगरसेवक आहेत. त्यात २४ नगरसेविका खुल्या गटातून निवडून आल्या आहेत.

पुण्याचे महापौरपद खुल्या गटासाठी; राज्यातील सोडत जाहीर

भोसरी विधानसभा मतदार संघातील सीमा फुगे, नानी घुले, निर्मला गायकवाड, सोनाली गव्हाणे, सारिका लांडगे, सारिका बोऱ्हाडे, साधना मळेकर, प्रियांका बारसे, पिंपरी मतदार संघातील शर्मिला बाबर, शैलेजा मोरे, कोमल मेवानी, सुजाता पालांडे आणि चिंचवड मतदार संघातील मोना कुलकर्णी, माया बारणे, माई ढोरे, निर्मला कुटे, सुनीता तापकीर, झामा बाई बारणे, सविता खुळे, करुणा चिंचवडे, संगीता भोंडवे, जयश्री गावडे, अर्चना चोंधे, सीमा चौघुले, निता पाडाळे यांचा समावेश आहे. यापैकी कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता आहे.

युवक काँग्रेस कात टाकणार; पुन्हा संघटन बांधणीचा निर्णय

विद्यमान महापौर राहुल जाधव यांचा कार्यकाल २२ नोव्हेंबरला संपुष्टात येत आहे. महापालिका निवडणूक फेब्रुवारी २०२२ मध्ये अर्थात दोन वर्षांनी आहे. यापूर्वी भाजपने दोन नगरसेवकांना महापौर पदाची संधी दिली आहे. त्यामुळे आगामी काळात दोन नगरसेविकांना महापौर पदावर संधी मिळू शकते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pimpri Chinchwad Munciple corporation will get Female Mayor