पिंपरीचे आमदार बनसोडे अखेर सापडले; पाहा आहेत कुठे?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

काही दिवस गायब झालेले बनसोंडना आज थेट शपथ घेताना पहिल्यांदाच विधीमंडळात दिसले. पिंपरी-चिंचवडमधील एका उद्योजक राजकारण्याच्या मुंबईतील बंगल्यात ते आजपर्यंत होते, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. ​

पिंपरी : महाराष्ट्रात झालेल्या राजकीय भूकंपानंतर गायब असलेले पिंपरी मतदारसंघाचे आमदार अण्णा बनसोडे अखेर सापडले आहे. आज विधीमंडतळातच शपथविधीसाठी ते उपस्थित होते. शपथ घेतल्यानंतर बनसोडेंनी 'जय राष्ट्रवादी'' अशी पक्षाची घोषणा न देता, 'जय हिंद,जय महाराष्ट्र' असा शिवसेना थाटाचा नारा दिला. पक्षाचे पुणे जिल्ह्यातील पुरंदरचे आमदार दत्तात्रेय भरणे यांनीही पाठोपाठ हाच नारा दिला.

कोण आहेत अण्णा बनसोडे? का होता त्यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांचा पहारा 

दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेले व मंगळवारी (ता. २६) राजीनामा दिलेले अजित पवार यांचे समर्थक पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे नॉट रिचेबल होते. त्यांचे कुटुंबीयही घरी नव्हते. मात्र, चिंचवड स्टेशन येथील निवासस्थान आणि जनसंपर्क कार्यालयाबाहेर पोलिस बंदोबस्त दिसत होता.त्यामुळे ‘कोण कोणाचे समर्थक’ यावर चर्चा सुरू होती पण या चर्चेला आता पुर्णविराम मिळाला आहे. कारण, काही दिवस गायब झालेले बनसोंड आज थेट शपथ घेताना पहिल्यांदाच विधीमंडळात दिसले. पिंपरी-चिंचवडमधील एका उद्योजक राजकारण्याच्या मुंबईतील बंगल्यात ते आजपर्यंत होते, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. 

मी राष्ट्रवादीतच होतो, आहे आणि असेन - अजित पवार

पिंपरी-चिंचवडला तीन आमदार आहेत. त्यापैकी भाजपचे, चिंचवडचे लक्ष्मण जगताप आणि भोसरीचे महेश लांडगे तर, राष्ट्रवादीचे पिंपरीचे बनसोडे आहे. त्यातील बनसोडे यांची आमदारकीची शपथ सकाळी दहा वाजता झाली. त्यानंतर पंधरा मिनिटांनी लांडगेंनीही शपथ घेतली  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pimpri MLA Anna Bansode was finally found