पोलिस महासंचालकांच्या परिषदेत पंतप्रधान मोदींचे महत्त्वाचे विधान

pm narendra modi statement at dgp conference in pune
pm narendra modi statement at dgp conference in pune

पुणे : ‘सीमेपलीकडील शत्रूकडून देशांतर्गत सुरक्षेला आव्हान दिले जात आहे. त्यामुळेच देशांतर्गत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे धोरण आहे. त्याबाबतीत कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. तसेच छुप्या कारवायांचे आव्हान पेलण्यास भारतीय तपास संस्था सक्षम आहेत,’ अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी पोलिस महासंचालक परिषदेत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. 

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
पाषाण येथील भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेमध्ये (आयसर) आयोजित पोलिस महासंचालक परिषदेच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात पंतप्रधान मोदी यांनी मार्गदर्शन केले. तंत्रज्ञानातील बदल, देशांतर्गत सुरक्षा, दहशतवाद यांसारख्या विषयांवरही त्यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘सीमेपलीकडील शत्रूंकडून देशांतर्गत सुरक्षेला आव्हान दिले जात आहे. त्या मुळे देशांतर्गत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल. राष्ट्रीय सुरक्षेबाबत कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. शत्रुंच्या छुप्या कारवायांचे आव्हान पेलण्यासाठी भारतीय तपास यंत्रणा सक्षम आहेत.’ दरम्यान, या परिषदेमध्ये हैदराबाद, उन्नाव येथील घटनांच्या पार्श्‍वभूमीवर देशातील महिलांवरील वाढते अन्याय-अत्याचार या विषयावरही चर्चा करण्यात आली असल्याची समजते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, उपसल्लागार दत्ता पडसलगीकर, ‘आयबी’चे प्रमुख अरविंद कुमार उपस्थित होते. परिषदेसाठी सर्व राज्यांच्या पोलिस महासंचालकांसह रिसर्च ऍनॅलिसिस विंग (रॉ), गुप्तचर विभाग (आयबी), राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) यांसारख्या तपास संस्थांचे प्रमुख उपस्थित आहेत. न्यायवैद्याकीय तपास आणि शास्त्रीय तपास हा या परिषदेचा मुख्य विषय आहे.

‘व्यायाम, योगा यात खंड नाही’
देशाचा कारभार चालवितानाच आपले आरोग्याकडेही गांभीर्याने लक्ष देणाऱ्या नरेंद्र मोदी शुक्रवारी रात्री पुण्यात मुक्कामी आले. दरम्यान, त्यांनी नियमीतपणे शनिवारी पहाटे पाच वाजता उठून योगा, पायी चालणे व हलका व्यायाम करण्यास प्राधान्य दिले. राष्ट्रीय पातळीवरील या परिषदेपासून माध्यमांना जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आहे. राष्ट्रीय सुरक्षेसंबंधीच्या संवेदनशील विषयांवरील चर्चेला पाय फुटू नयेत व अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव माध्यमांना दूर ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com