esakal | 'कार्यकर्ते तुपाशी अन् सामान्य नागरिक उपाशी'; पुण्यातील नगरसेवकांनी रेशन पळवलं!
sakal

बोलून बातमी शोधा

Swast-Dhanya-Ration

कीट घेण्यासाठी नागरिकांची गर्दी लोटल्यामुळे त्यांनी वाटप तत्काळ थांबविले. रेशनचे वाटप का होत नाही म्हणून नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. ​

'कार्यकर्ते तुपाशी अन् सामान्य नागरिक उपाशी'; पुण्यातील नगरसेवकांनी रेशन पळवलं!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

येरवडा (पुणे) : कोरोना व्हायरसमुळे येरवडा भाग कंटेन्मेट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. या परिसरात तब्बल ३० वस्त्यांमध्ये तीस हजारापेक्षा अधिक घरांचा समावेश होतो. महापालिकेने येथील प्रत्येक घरटी रेशन देण्याची घोषणा केली होती. मात्र फक्त बारा हजार रेशन कीट आले.

मात्र महापालिकेकडे वाटपाची यंत्रणाच नसल्यामुळे त्यांनी ते कीट नगरसेवक व प्रमुख कार्यकर्त्यांना वाटण्यासाठी दिले. यासंधीचे सोनं करण्यासाठी नगरसेवकांनी आपल्या मर्जीतल्या कार्यकर्त्यांना व मतदारांना वाटले. त्यामुळे कार्यकर्ते तुपाशी, तर सर्वसामान्य जनता उपाशी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

- 'डीएसके' प्रकल्पातील फ्लॅटधारक मुंबई हायकोर्टाच्या दारात; 'ही' याचिका केली दाखल!

गेल्या महिन्यात पुणे महानगरपालिकेने कंटेन्मेट परिसरातील मेडिकल वगळता सर्व दुकाने बंद केली. त्यामुळे परिसरात लोकांची उपासमार होऊ नये म्हणून रेशन कीट देण्याची घोषणा केली. त्याप्रमाणे येरवडा क्षेत्रीय कार्यालयाला वीस हजार कीट आले. त्यापैकी प्रभाग क्रमाक सहा येरवड्याच्या वाटयाला बारा हजार कीट आहे. हे कीट वाटण्याचा महापालिकेच्या आरोग्य विभागाने प्रयत्न केला मात्र त्यांना शक्य झाले नाही.

- धक्कादायक! दौंडमध्ये कोरोना तपासणीचे रिपोर्ट झाले व्हायरल!

कीट घेण्यासाठी नागरिकांची गर्दी लोटल्यामुळे त्यांनी वाटप तत्काळ थांबविले. रेशनचे वाटप का होत नाही म्हणून नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. येरवडा क्षेत्रीय कार्यालयाने नगरसेवकांनाच रेशन कीट वाटण्याची विनंती केली. त्यामुळे चालून आलेली संधी नगरसेवक कशी सोडणार त्यांनी हे आव्हान स्विकारले.

- २३ वर्षाचा तरूण कोरोनामुळे दगावला; पुण्यातील आजचे अपडेट्स जाणून घ्या!

येरवड्यातील विरोधी पक्षाच्या पुढाऱ्यांनी अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्यामुळे त्यांनाही रेशन कीट वाटपाची जबाबदारी दिली. त्यामुळे नगरसेवक व पुढाऱ्यांनी हे रेशन कीट आपल्याच कार्यकर्त्यांना व खास मतदारांना वाटले नसले तर नवलच म्हणावे लागेल. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना रेशन कीट मिळालेच नाही. हे नागरिक अजूनही हताशपणे रेशन कीटची वाट पाहत आहे.

- इंटरनेट गंडल्याने 'वर्क फ्रॉम होम'मध्ये खोडा; नोकरदारांसोबत नागरिकही वैतागले!

‘‘महापालिकेच्या वतीने कंटेन्मेट परिसरात रेशन कीट वाटण्यासाठी आले होते.मात्र ते पुरेशे नव्हते. आता लॉकडाउन संपल्यामुळे रेशन कीट वितरीत करण्याचे थांबविले आहे. ’’
- विजय दहिभाते, उपायुक्त, पुणे महानगरपालिका.

किराणा दुकान सुरू पण पैस नाहीत
येरवड्यातील कंटेन्मेट परिसरात आता दुकाने सुरू झाली आहे. मात्र धुणीभांडी करणाऱ्या महिला, बांधकाम मजुर, कचरा वेचक यांच्याकडे पैसेच नसल्यामुळे ते खरेदी करून शकत नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा