esakal | पुणे : मनपा कर्मचाऱ्यांचे कपडे घालून 'त्यांनी' खरेदी केला गांजा!
sakal

बोलून बातमी शोधा

PMC-Workers

पुणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा गणवेश घातलेले हे तोतया कर्मचारी जाताना खडकवासला येथे आईला डब्बा द्यायला चाललो आहे, असे सांगून गेले होते.

पुणे : मनपा कर्मचाऱ्यांचे कपडे घालून 'त्यांनी' खरेदी केला गांजा!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

किरकटवाडी : पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी असल्याचे भासवत खडकवासला येथे गांजा खरेदीसाठी आलेल्या दोघांना हवेली पोलिसांनी अटक केली. खडकवासला येथे नाकाबंदी दरम्यान रविवारी (ता.१२) ही कारवाई करण्यात आली.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ऋषी रवींद्र मोरे (वय २२) आणि सागर चंद्रकांत सुर्वे (वय २०, दोघेही रा. पर्वती) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

आणखी वाचा - सोशल डिस्टंसिंग जर्मनीकडून शिका!

पुणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा गणवेश घातलेले हे तोतया कर्मचारी जाताना खडकवासला येथे आईला डब्बा द्यायला चाललो आहे, असे सांगून गेले होते.

त्यांना येताना उशीर झाल्याच्या संशयावरून पोलिस हवालदार राजेंद्र मुंडे यांनी त्यांना तपासले असता त्यांच्याकडे जेवणाच्या डब्यात सुमारे ३०० ते ४०० ग्रॅम गांजाच्या पुड्या आढळून आल्या.

- Fight with Coronavirus : देशातील 'हे' २५ जिल्हे आहेत कोरोनामुक्तीच्या वाटेवर; महाराष्ट्रातील...!

त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता ते महानगरपालिका कर्मचारी नसल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे हवेली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अशोक शेळके यांनी सांगितले.

- 'लोकांना जीवाचं पडलंय अन् मोदींना प्रचाराचं'; वाराणसीमध्ये 'मोदी गमछा'चे वाटप!