Bhosari : गवळीनगरमध्ये दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा

भोसरीतील गवळीनगर गल्ली क्रमांक एकमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा गेल्या दीड वर्षापासून होत आहे. मात्र असे असतानाही महापालिकेला ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्यात अपयश आले
Bhosari
Bhosari Sakal

Bhosari - येथील गवळीनगरमध्ये पिण्याचे पाणी दुर्गंधीयुक्त गढूळ येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांनी पिंपरी -चिंचवड महापालिकेकडे तक्रार केल्यावर महापालिकेद्वारे पाण्याची लाईन वाश आऊट केली जाते. मात्र दोन-तीन दिवसात पुन्हा अशीच परिस्थिती उद्भवते. हा प्रकार गेल्या दीड वर्षापासून सुरू असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

भोसरीतील गवळीनगर गल्ली क्रमांक एकमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा गेल्या दीड वर्षापासून होत आहे. मात्र असे असतानाही महापालिकेला ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्यात अपयश आले आहे. त्यामुळे गवळीनगरमधील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही समस्या तातडीने सोडवण्याची मागणी येथील येथील नागरिक चंद्रकांत धोंगडे, रेखा धोंगडे, सयाजी वळसे, नाना जाधव आदींनी केली आहे.

Bhosari
Mumbai : भंडार्ली डम्पिंग 14 गावातील ग्रामस्थ बंद पाडणार; शिंदे सरकारला पुन्हा असहकार्याची भूमिका

याविषयी माजी नगरसेवक जालिंदर शिंदे यांनी सांगितले की, दीड वर्षांपूर्वी महापालिकेने येथे ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम केले. मात्र ही ड्रेनेज लाईन कमी उंचीवर बांधल्याने पिण्याच्या पाईपलाईनच्या पातळीवर आली आहे. येथील जुन्या पिण्याच्या पाईपलाईनमधून हे गटाराचे पाणी नागरिकांच्या घरांमध्ये जाते. महापालिका प्रशासनाने ही समस्या तातडीने सोडवली नाही तर प्रशासना विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

Bhosari
Mumbai Pune Highway : जन्म बाईचा... बाईचा...‘गैरसोयींचा’! मुंबई-पुणे मार्गावर स्त्रियांसाठी पुरेशी स्वच्छतागृहेच नाहीत

तर सामाजिक कार्यकर्ते देविदास गोफणे यांनी सांगितले की येथील पिण्याच्या पाईपलाईन 25 ते 30 वर्षांपूर्वी टाकण्यात आल्या आहेत. त्या बऱ्याच ठिकाणी नादुरुस्त झाल्यामुळे गटाराचे पाणी पाईपलाईनमधून नागरिकांच्या घरात शिरते. शुक्रवारी (ता. 14) महापालिकेद्वारे येथील पिण्याची पाईपलाईन वाश आऊट करण्यात आली होती. ‌

गवळीनगरमध्ये पाणी गढूळ येत असल्यामुळे पाणी आल्यावर सुरुवातीचे 15 ते 20 मिनिटे रस्त्यावर पाणी सोडावे लागते. त्यानंतर पिण्याचे पाणी भरावे लागते. पाणी स्वच्छ मिळण्यासाठी घरात फिल्टर बसवला आहे. ही समस्या दीड वर्षापासून आहे.

-धर्मा पाटील, नागरिक, गवळीनगर.

Bhosari
Mumbai : दारूसाठी पैसे दिले, बसायला खुर्ची ही दिली नाही; दारुड्याने सेक्युरिटी गार्डच्या डोक्यात घातला दगड

गवळीनगर मधील नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर पिण्याच्या पाईपलाईनचे वाश आऊट केले जाते. गवळीनगरमधील पिण्याच्या पाईपलाईन टाकण्याचे काम काही नागरिकांच्या विरोधामुळे अर्धवट राहिले आहे. ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी येथे नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम लवकर सुरू करण्यात येईल.

-प्रवीण बांबळे, कनिष्ठ अभियंता, पाणीपुरवठा विभाग,ई क्षेत्रीय कार्यालय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com