पीएमपी भाडेवाढ आत्ताच नको - देवेंद्र फडणवीस

PMPML
PMPML

पुणे - पीएमपीच्या ताफ्यात १५०० ई-बस झाल्याशिवाय तिकिटांचे दर वाढवू नका, अशी सूचना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेतील बैठकीत पीएमपीच्या अधिकाऱ्यांना गुरुवारी केली. तसेच सर्वसामान्यांना सार्वजनिक वाहतूक किफायतशीर दरात मिळाली पाहिजे, व त्यासाठी महापालिकेने पीएमपीला मदत केली पाहिजे, याचाही पुनरुच्चार त्यांनी केला. या बैठकीत समान पाणी पुरवठा योजना, जायका, नदी सुधारणा, समाविष्ट ११ गावांचा विकास आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, चांदणी चौक उड्डाण पूल, पूरनियंत्रण, वैद्यकीय महाविद्यालय, घनकचरा व्यवस्थापन आणि पीएमपी या विषयांचे सादरीकरण त्या-त्या विभागांनी केली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिकेत झालेल्या आढावा बैठकीत पीएमपीतर्फे अध्यक्ष डॉ. राजेंद्र जगताप यांनी फडणवीस यांना पीएमपीबद्दल सादरीकरण केले. पाच मिनिटांत, पाच किलोमीटर प्रवास अवघ्या पाच रुपयांत प्रवासाची सुविधा देणारी अटल योजना, विमानतळासाठीची अभी योजना, कलर कोडिंगची करिष्मा योजना, पीएमीबपचे ॲप, विविध स्थानकांत सुरू असलेले सौर ऊर्जा प्रकल्प, आगारांच्या विकासाचा प्रकल्प, डेक्कन जिमखाना स्थानकावर साकारत असलेले स्मार्ट हब फॉर ऑटोमोटिव्ह रिसर्च ॲड डेव्हलपमेंट, कोरोना आणि लॉकडाउनच्या काळात पीएमपीने बजावलेली कामगिरी आदींचा त्यात समावेश होता.

महापालिका आणि पीएमपीकडे निधीची कमतरता असल्यामुळे उद्योगांच्या सामाजिक जबाबदारीच्या जाणिवेतून मिळणाऱ्या निधीतून काही विकास योजना सुरू असल्याचेही जगताप यांनी यावेळी नमूद केले. पीएमपीच्या ताफ्यात सध्या १५० ई-बस असून पुढील सहा महिन्यांत ५०० ई- बस दाखल होणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.

प्रवासीकेंद्रित सुविधांच्या निर्मितीवर पीएमपीने अधिक भर द्यावा आणि ‘अटल’सारखे आणखी उपक्रम राबवावेत. सार्वजनिक वाहतुकीसाठी पुणे महापालिकेने पीएमपीला पुरेसा निधी द्यावा.
- देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com