पुणे रेल्वे स्थानकातून पीएमपीची 'रातराणी' सेवा; फेऱ्यांसह दरही वाढवले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

रेल्वे प्रवाशांना शहराच्या विविध भागांत जाण्यासाठी काही दिवसांपूर्वी पीएमपीने थेट रेल्वे स्थानकाच्या आवारातून लेन क्रमांक चारमधून बससेवा सुरू केली आहे. या सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून आर्थिक उत्पन्नही वाढत आहे. मात्र, या बस केवळ दिवसा चालू असल्याने रात्रीच्या वेळी रेल्वेने ये-जा करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत होती.

पुणे : प्रवाशांची वाढता प्रतिसाद आणि त्यातून मिळणारे उत्पन्न विचारात घेता पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) रेल्वे स्थानकाच्या आवारातून रात्रीच्या वेळेस देखील बससेवा सुरू केली आहे. या रातराणी बसचे वेळापत्रक पीएमपीने जाहीर केले आहे. फेऱ्यांसह रातराणीच्या तिकीट दरात देखील 25 टक्‍यांनी वाढ करण्यात आली आहे.

पुणे : टेम्पो ट्रॅव्हलरच्या धडकेत जखमी झालेल्या विद्यार्थीनीचा मृत्यू 

रेल्वे प्रवाशांना शहराच्या विविध भागांत जाण्यासाठी काही दिवसांपूर्वी पीएमपीने थेट रेल्वे स्थानकाच्या आवारातून लेन क्रमांक चारमधून बससेवा सुरू केली आहे. या सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून आर्थिक उत्पन्नही वाढत आहे. मात्र, या बस केवळ दिवसा चालू असल्याने रात्रीच्या वेळी रेल्वेने ये-जा करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत होती. यामुळे, रात्रीची बससेवा सुरू करण्याची मागणी प्रवाशांनी केली होती. या मागणीला पीएमपीने सकारात्मकता दर्शवीत रात्रीची बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. रात्रीच्या बससेवेच्या संचलनासाठी 15 बस उपलब्ध राहणार असल्याचे, पीएमपी प्रशासनाने सांगितले आहे.

हिंजवडी : टीसीएस कंपनीच्या आवारातच इंजिनिअरने केली आत्महत्या

रातराणी बसचे वेळापत्रक :
पुणे रेल्वे स्थानक ते रामोशी गेट स्वारगेटमार्गे (दर 30 मिनिटांनी)
रेल्वे स्थानक ते हडपसर पुलगेट वेस्टएन्ड मार्गे (दर 25 मिनिटांनी)
रेल्वे स्थानक ते एनडीए गेट शिवाजीनगर-डेक्कन-वारजेमार्गे (दर 45 मिनिटांनी)
रेल्वे स्थानक ते वाघोली येरवडा-चंदनगरमार्गे (दर दीड तासाने)
रेल्वे स्थानक ते भोसरी शिवाजीनगर-बोपोडी-कासारवाडीमार्गे ( दर एक तासाने)
रेल्वे स्थानक ते निगडी शिवाजीनगर-बोपोडी-पिंपरीमार्गे (दर 45 मिनिटांनी) 

बापरे! रिक्षा चक्क उलट्या दिशेने धावली...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PMPML Bus Night Service from Pune Railway Station