Pooja Chavan Suicide: देवेंद्र फडणवीसांचे पोलिस महासंचालकांना पत्र; वाचा काय म्हणाले?

टीम ई-सकाळ
Friday, 12 February 2021

देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रकरणातील १२ ऑडिओ क्लिप्स आहेत. 

Pooja Chavan Suicide case : पुणे : टिकटॉक या सोशल प्लॅटफॉर्मवरील स्टार पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमधील एका मंत्र्याचं नाव असल्याने विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लिप्सच्या अनुषंगाने सर्वकष चौकशीची मागणी केली आहे. याबाबतचे एक पत्र त्यांनी राज्याचे पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांना लिहले आहे. 

पूजाने रविवारी (ता.7) मध्यरात्री अपार्टमेंटच्या टेरेसवरून उडी मारुन तिचे जीवन संपविले. पूजाने आत्महत्या का केली? असे काय घडले होते, ज्यामुळे तिने आत्महत्या केली? ही हत्या आहे ती आत्महत्या असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यामुळे बंजारा समाजात अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 

हेही वाचा - शरद पवारांच्या आधीच केला पुतळ्याच्या अनावरणाचा प्रयत्न; पडळकरांवर गुन्हा दाखल

देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रकरणातील १२ ऑडिओ क्लिप्स आहेत. या ऑडिओ क्लिप्समध्ये बोलणारे कोण आहेत, या संवादाचा नेमका अर्थ काय? पूजाने खरोखर आत्महत्या केली की तिला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आलं आहे, असे अनेक प्रश्न फडणवीस यांनी यानिमित्ताने उपस्थित केले आहेत. तसेच सध्याचा तपास वरकरणी होत असल्याने तिच्या मृ्त्यूबाबत संशयाचे वातावरण निर्माण होत आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. या सर्व १२ ऑडिओ क्लिप्सची सखोल आणि सर्वकष चौकशी व्हावी, तसेच बंजारा समाजात लोकप्रिय तरुणीला तत्काळ न्याय द्यावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही फडणवीस यांनी केली आहे. 

Valentine Special : '... पण तू माझ्या लहान भावासारखा आहेस!'

दरम्यान, मूळची बीडची असलेली पूजा इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स करण्यासाठी पुण्यात आली होती. भाऊ आणि मित्रासोबत ती वानवडी येथील हेवन पार्क सोसायटीमध्ये वास्तव्यास होती. रविवारी मध्यरात्री तिनं सोसायटीच्या टेरेसवरुन उडी मारत आत्महत्या केली. अपघाती मृत्यू अशी नोंद वानवडी पोलिसांनी केली आहे. 

Air force recruitment 2021: हवाई दलात २५५ जागांची भरती; लगेच करा अर्ज​

 - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pooja Chavan Suicide case BJP Devendra Fadnavis write letter to DGP Hemant Nagarale