पुणे विद्यापीठात परीक्षा व मूल्यमापन संचालकपदासाठी 16 जण पात्र

For the post of Director of Pune University Examination and Evaluation 16 candidates qualified
For the post of Director of Pune University Examination and Evaluation 16 candidates qualified

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालकपदासाठी 16 जणांची नावे पात्र झाली आहेत. त्यांची नावेसंकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या विभागाला पूर्णवेळ संचालक मिळणार आहे.

करार न केल्यास पाणीपट्टी दुपटीने आकारणार

परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे तत्कालीन संचालक डॉ. अशोक चव्हाण यांनी त्यांचा कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी सुमारे तीन महिन्यांपूर्वी राजीनामा दिला होता. या रिक्त झालेल्या पदाचा अतिरिक्‍त कार्यभार इलेक्‍ट्रानिक्‍स विभागाचे प्रमुख डॉ. अरविंद शाळिग्राम यांना सोपविण्यात आला. तसेच हे रिक्त झालेले संचालकपद भरण्यासाठी विद्यापीठाने प्रक्रिया सुरू केली होती.

#RighttoService आधी 'मेवा' मग 'सेवा'!

विद्यापीठाने संचालकपदासाठी जाहिरात देऊन अर्ज मागविले होते. त्यामध्ये एकुण 26 जणांनी अर्ज केले. त्यानंतर अर्जांची छाननी करण्यात आली. त्यामध्ये मध्ये 16 अर्ज पात्र झाले. 8 अर्ज अपात्र तर 2 अर्ज मुदत संपल्यानंतर आल्याने त्यांचा विचार या पादासठी करण्यात आलेला नाही. या पात्र उमेदवारामंमध्ये पुढील भरती प्रक्रिया राबविली जाईल, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

वाढत्या फॅशनमुळे ब्यूटिपार्लर तेजीत

महेश काकडे, दत्तात्रय कुटे, वाल्मिक सरवदे, काशिनाथ मुंडे, रत्ना निंबाळकर, गेनू दरेकर, मिलिंद सूर्यवंशी, प्रदीपकुमार दराडे, राजकुमार देशपांडे, प्रशांत मुळे, भारत जिंतुरकर, प्रभाकर भटुप्रसाद, योगेश नेरकर, सुभाष वाडगुळे, अर्जुन घाटुळे, सुजाता आडमुडे हे उमेदवार पात्र ठरले आहेत. तर, आयुषी गाडेकर, चंद्रकुमार कदम, प्रीती कटारिया, भागवत जाधव, सुरेश शिरबहादूरकर, विजय घाटगे, बलभीम बनसोडे, रवींद्र क्षीरसागर यांचे अर्ज अपात्र ठरले. साहेबराव धनवटे व मधुरा जगताप यांनी मुदतीनंतर अर्ज आल्याने अपात्र ठरले.
जिल्हा परिषद अध्यक्ष आरक्षण सोडतीचे काय करायचे?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com