अंगावर आसूड झेलणाऱ्यांच्या नशिबी सरकारचेही फटके...

potraj.jpg
potraj.jpg

हडपसर (पुणे) : पोतराज हा आपल्या समाजाचे एक दुर्लक्षित अंग. पोटासाठी मरिआईच नाव घेऊन नाचतात. स्वत:च्या अंगावर आसूड ओढतात. देवीच्या भक्तांनी त्यांना अनेक नावे दिली असली तरी सरकार दरबारी कोणतीही नोंद नसल्याने त्यांना शासनाच्या योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. 
पोतराजांना गावाकडे राहायला स्वतःचे धड घर नाही, उदरनिर्वाहासाठी जमीन नाही, कर्ज घेऊन धंदा करावा तर त्यासाठी हवी असलेली कोणतीही कागदपत्र नाही. त्यामुळे पोटापाण्यासाठी बिऱ्हाड पाठीवर घेऊन बायको -मुलांसह डोक्‍यावर देवीचा देव्हारा घेऊन, फिरून अंगावर आसूडाचे फटके सहन करत त्यांना फिरावे लागते. या समाजातील अंधश्रद्धा दूर करून मागासलेल्या या समाजाच्या उन्नतीसाठी शासनाने प्रयत्न करण्याची गरज आहे. 

पोतराज रामदास पवार म्हणाले, आम्हाला खेडोपाडी देवीच्या नावाने जोगवा मागत वणवण फिरावे लागते. त्यातून जो काही तुटपुंजा पैसा मिळतो तो साठवून त्याचा पावसाळ्यात वापर केला जातो. पावसाळ्यात आमच्या हालांना पारावर नसतो. रुढींच्या नावाखाली आमच्या जमातीचे मातेर झालेले आहे. इथे शहरी लोक आपल्या मुलांना कॉनवेंटमध्ये टाकायचे का इंटरनॅशनल स्कूलमध्ये, या चिंतेत असताना पोतराजांच्या मुलांना मात्र शिक्षण सोडून थंडी वाऱ्यात आई-बापाच्या मागे देवीच्या नावाने जोगवा मागायला जावे लागते. 

स्वतःच्या अंगावर आसूडाचे फटके ओढत... पोटाची खळगी भरण्यासाठी आत्मक्‍लेष करून घेत... आसुडाच्या फटक्‍यामुळे होणाऱ्या जखमाही, पोतराजांना पोटभर अन्न देवू शकत नाहीत. त्याचबरोबर शिक्षणाचा अभाव, अंधश्रद्धा आणि देवीच्या कोपाच्या भीतीने पोतराजाला त्यातून बाहेरही काढण्यासाठी प्रयत्न होणे आवश्‍यक आहे. 

आम्हाला सरकारकडून घरकुल मिळत नाही. हाती कामधंदा नाही. समाजानेही आमच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. आमच्यावर दुसऱ्यांचे भविष्य व संकटावर उपाय सांगत फिरण्याची वेळ आली. मात्र आमचे भविष्य व आमच्या संकटावरील उपायासाठी देवाधर्माच्या नावाने भीक मागावी लागते. यापेक्षा पोतराज समाजाचे दुर्दैव ते काय? 
- संतोष जाधव, पोतराज. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com