सकाळ बातमीचा इम्पॅक्ट : पांडे कुटुंबियांचा विद्युत पुरवठा सुरळीत

सकाळ बातमीचा इम्पॅक्ट : पांडे कुटुंबियांचा विद्युत पुरवठा सुरळीत

गोखलेनगर : जुने मिटर बसवल्याने वाढीव बिल आल्याची तक्रार महावितरण कंपनीला कुसूम कालिकाप्रसाद पांडे यांनी केली. या बाबात सविस्तर माहिती दैनिक सकाळच्या माध्यमातून शुक्रवार (ता.४ डिसेंबर) रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. बातमीची दखल महावितरण कंपनीने पांडे यांना नवीन मिटर बसवून विद्यूत पुरवठा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुढील सहा महिन्याचा वीजवापर पाहून त्याचा अहवाल कार्यवाहीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात येणार असल्याचे पांडे यांना देण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे.

जनवाडी-जनता वसाहत येथे वास्तव्यास असलेल्या पांडे कुटुंबियांना घरातील वीज बील ९९ हजार ७८० रूपये आले होतो.धुनीभांडी करणाऱ्या कुसूम व सुरक्षा रक्षक (वॉचमन) म्हणून काम करणारे त्यांचे पती यांनी वाढीव बील भरायचे कसे
असा प्रश्न पांडे कुटुंबीय विचारत होते.

दरम्यान, मार्च २०२० मध्ये वीज कनेक्शन बंद केलेले असताना देखील रिडींग न घेताच महावितरण कंपनीने बील  देण्याचा प्रताप केला होता.बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर विद्यूत पुरवठा सुरळीत करण्याचे पत्र पांडे यांना देण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com