esakal | दुर्लक्षित रुग्णांसाठी माळेगावची प्रज्ञा काटे ठरतेय तारणहार

बोलून बातमी शोधा

covid19

दुर्लक्षित रुग्णांसाठी माळेगावची प्रज्ञा काटे ठरतेय तारणहार

sakal_logo
By
कल्याण पाचांगणे : सकाळ वृत्तसेवा

माळेगाव ः देशात व महाराष्ट्रात कोरोनारुपी शत्रूला रोखण्यासाठी डाॅक्टरांसह परिचारिका व कर्मचारी जीवाची बाजी लावून काम करीत आहेत. अशा आणीबाणीच्या काळात आपणही रुग्णमित्र म्हणून खारीचा वाटा उचलला पाहिजे, या भावनेतून शारदानगरच्या शारदाबाई पवार महिला महाविद्यालयातील एक युवती मोठ्या धाडसाने गरजू रुग्णांना औषोधोपचार वेळत व मोफत मिळवून देण्यासाठी प्रय़त्न करत आहे. अर्थात अनेक दुर्लक्षित घटकांसाठी तारणहार ठरलेल्या या तरुणीचे नाव आहे प्रज्ञा सतिश काटे (रा. माळेगाव खुर्द, ता. बारामती).

हेही वाचा: पुणे : वाढत्या प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेता जैववैद्यकीय कचऱ्यासाठी विघटन प्रकल्प

अॅग्रीकल्चर डेव्हलमेंट ट्रस्ट बारामतीच्या शारदाबाई पवार महिला महाविद्यालयात `बीएस्सी`च्या तृतीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या प्रज्ञा हिने महात्मा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत विविध आजाराने ग्रासलेल्या गरजू रुग्णांना येथील गिरिराज हाॅस्पीटलमधून मोफत शस्त्रक्रिया व औषधोपचार मिळवून दिला आहे. गेल्या तीन महिन्यात १५ गरजूंवर विविध प्रकाराच्या शस्त्रक्रिया व औषधोपचार मोफत झाले आहेत. त्यामध्ये अनुष्का माने (रा. राख, ता. पुरंदर) हिचा अपघात झाला असता तिची अडीच लाख रुपयांची मोफत शस्त्रक्रिया येथे झाली आहे. विक्रम मोरे (रा. भिगवण) यांच्याही हृदयात रक्ताची गुठळी तयार झाली असता त्यांनाही मोफत औषधोपचार मिळाल्याने ते सध्या नाॅर्मल जीवन जगत आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सर्वत्र भितीचे वातावरण आहे. अशा प्रतिकूल स्थितीत सुद्धा न डगमगता प्रज्ञाने तिचे कार्य़ उत्तमरित्या सुरू ठेवले आहे. अर्थात गिरिराज हाॅस्पीलटचे प्रमुख डाॅ. रमेश भोईटे यांनीही मनाचा मोठेपणा दाखवित संबंधित रुग्णांना चांगली मदत केल्याची माहिती पुढे दिली. विशेषतः शारदाबाई पवार महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) माध्यमातूनही प्रज्ञाने व तिच्या टिमने समाजपयोगी अनेक कामे याआगोदर गावपातळीवर केल्याची नोंद आहे. दरम्यान, प्रज्ञा काटे हि शेतकरी कुटुंबातील मुलगी असून तिचा भाऊ मतीमंद आहे. प्रज्ञाला सामाजिक कार्य़ाची आवड आहे.

हेही वाचा: पुणे जिल्ह्यात 1 मेपर्यंत काय असतील निर्बंध? 18 प्रश्नांची उत्तरे

शारदाबाई पवार महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातूनही प्रज्ञा व तिच्या टिमने अनेक समाजपयोगी कामे केली आहेत. त्यामध्ये बाललैंगिक शोषणाविरुद्ध जनजागृती, अवयवदान जनजागृती, कोरोना काळामध्ये पोलिस मित्रांसाठी एनर्जी ड्रिंक आणि पाण्याचे वाटप करणे, मराठा सहकार्य समूह माध्यमातून मेडिकल टीममध्ये सहभाग घेणे व कोरोना काळात ५० पेक्षा जास्त रुग्णांना प्लाझ्मा मिळवून देणे, अनाथ मुलांसाठी भोजन व्यवस्था करणे अशा अनेक सामाजिक कामांमध्ये ती सक्रीय असते.

कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी व रुग्णांना चांगली सेवा मिळून देण्यासाठी बारामतीत सर्वजण काम करीत आहेत. त्यानुसार मीही माझ्या परीने या कार्य़ात खारीचा वाटा उचलत आहे. या कार्य़ात गिरिराज हाॅ स्पिटल प्रशासन आणि मराठा सहकार्य़ समूहाचेही योगदान महत्वपुर्ण ठरत आहे. -प्रज्ञा काटे

हेही वाचा: बारामती लोकसभा मतदार संघातील रस्त्यांसाठी 25 कोटींचा निधी मंजूर