जैवअर्थव्यवस्थेला मिळणार 'बायोप्रिझम'चा बूस्टर 

praj president pramod chaudhari
praj president pramod chaudhari

पुणे, ता. 9 - शाश्‍वत विकास आणि कृषिपूरक अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी "नूतनीकरणक्षम रसायने आणि पदार्थ उद्योगांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठाची गरज आहे. जैवउद्योगांतील उत्पादनांचे संशोधन, तंत्रज्ञान आणि भागीदारीसाठी प्राज इंडस्ट्रीजच्या वतीने "बायोप्रिझम' पोर्टफोलिओचे अनावरण करण्यात आले. 

ऍडव्हान्स बायोइकोनॉमी लिडरशीप कॉन्फरन्सच्या एका समांतर ऑनलाइन सत्रात प्राजचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांच्या उपस्थितीत बायोप्रिझमच्या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. डॉ.चौधरी म्हणाले,""जैवइंधनाशी निगडित "बायोमोबीलीटी'मध्ये गेली तीन दशके प्राज कार्यरत आहे. बायोप्रिझममुळे एक नवा आयाम जोडला गेला आहे. रेण्वीय जीवशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, किण्वन आणि रासायनिक संश्लेषणातील आजवरच्या अथक संशोधनातून नूतनीकरणक्षम रसायने आणि पदार्थ उद्योगांसाठी शाश्‍वत विकासाचा हा आयाम उभा राहिला आहे.'' बायोप्रिझमच्या माध्यमातून बायोप्लास्टीक, सेल्युलोज तंतू आदी जैवउत्पादनांसंबंधीचे तंत्रज्ञान आणि विकासाला प्राधान्य दिले जाणार आहे. 

बायोप्रिझममुळे नूतनीकरणक्षम रसायन आणि पदार्थ उद्योगांना तर फायदा होईलच, पण त्याचबरोबर कृषी आणि कृषिपूरक उद्योगांनाही मोठा फायदा होणार आहे. संशोधन आणि विकासासाठी प्राजने राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेशी (एनसीएल) सहकार्य करार केला असून, आंतरराष्ट्रीय स्तरावरही सहभागीता वाढविण्यात आली आहे. स्वच्छ ऊर्जा आणि पर्यावरणपुरक विकासासाठी प्राजचे हे पाऊल देशातील एका मोठ्या क्षेत्राची मुहूर्तमेढ रोवणार आहे. 

नूतनीकरणक्षम रसायने आणि पदार्थ उद्योग दृष्टिक्षेपात  
- अर्थव्यवस्थेतील संधी (स्रोत-  टेक्‍नॉन ऑर्बिकेम रिपोर्ट) 
1) नूतनीकरणक्षम रसायने - 65 अब्ज डॉलर 
2) जैवऊर्जा - 800 अब्ज डॉलर 
3) रसायने - 25,000 अब्ज डॉलर 
4) ऊर्जा - 50, अब्ज डॉलर 

भारतातील प्लास्टिकचा वापर 
वर्ष - दरडोई प्लास्टिक वापर - जैवप्लास्टिक 
2019 - 12 कि.ग्रॅ. - 1 टक्के 
2022 - 15 कि.ग्रॅ. - 2 टक्के 
2025 - 20 कि.ग्रॅ  - 4 टक्के 

भारतातील प्लास्टिक मार्केट 
वर्ष - एकूण मार्केट - गुंतवणुक संधी 
2019 - 31.2 कोटी डॉलर - 20.3 कोटी डॉलर 
2020 - 78 कोटी डॉलर - 50.7 कोटी डॉलर 
2025 - 208 कोटी डॉलर - 135.2 कोटी डॉलर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com