esakal | आळंदी येथे अस्थी विसर्जन करण्यावर बंदी
sakal

बोलून बातमी शोधा

immersion

आळंदी येथे अस्थी विसर्जन करण्यावर बंदी

sakal_logo
By
विलास काटे

आळंदी : कोरोनाने मृत्यू पावलेल्यांच्या अस्थी विसर्जन आळंदीत सध्या मोठ्या संख्येने होत आहे. मयताचे नातेवाईकही यासाठी गर्दी करत असल्याने आळंदीत इंद्रायणी काठी चालणारे अस्थी विसर्जन आणि दशक्रिया विधीवर पू्र्णतः बंदीचा आदेश आज आळंदी पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरिक्षक ज्ञानेश्वर साबळे आणि मुख्याधिकारी अंकूश जाधव यांनी संयूक्तपणे काढला आहे. सध्या पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत कोरोनाने मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. दोन्ही शहरामध्ये अस्थी विसर्जनासाठी नदीची गटारगंगा झाल्याने सोय नाही.

हेही वाचा: पुणे : वाढत्या प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेता जैववैद्यकीय कचऱ्यासाठी विघटन प्रकल्प

तसेच काही ठिकाणी शहरांमध्ये अस्थी विसर्जनासाठी बंदी असल्याने पर्याय म्हणून लोक आळंदीकडे धाव घेत आहे. सकाळी सहा ते सायंकाळी सहा या वेळेत इंद्रायणी काठी भक्त पुंडलिक मंदिराजवळ अस्थी विसर्जनाचा धार्मिक विधी कार्यक्रम चालत आहे. एकाच वेळी ब-याचदा दहा ते पंधरा लोकांचे रांगेत फोटो ठेवून अस्थी विसर्जन चालते. त्यासाठी असणारी लोकांची गर्दी आणि हेच मयत कोरोनाग्रस्तांचे नातेवाईक पुन्हा शहरात विविध ठिकाणी फिरत असतात. दुसरीकडे स्थानिक पालिका आणि पोलिस प्रशासन कोरोनाचा सुपरस्प्रेड होवू नये यासाठी दुकाने, स्थानिक व्यावसायावर बंदी करून प्रसंगी दंडात्मक कारवाई करत आहे. मात्र शहरी भागातून अस्थी विसर्जनासाठी येणा-या सुपर स्प्रेडरवर मात्र कोणतीच कारवाई नाही आणि बंदीही नाही. यामुळे ग्रामस्थांनी इंद्रायणी काठी चालणारे अस्थी विसर्जन आणि दशक्रिया विधी वर बंदी घालण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती. यामध्ये ग्रामस्थांचे म्हणणे होते की, आम्ही नियम पाळतो मग बाहेरून आलेल्यांच्या गाड्या कुठेही पार्क केल्या जातात. तसेच शहरात त्यांचा मुक्त संचार असतो. अशावेळी कोरोनाचा प्रसार थांबणार कसा. त्यातच आळंदीत कोरोनाने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. रोज दहा ते पंधरा रूग्ण पॉझिटिव्ह आढळत आहे. अशा वेळी आळंदी शहराच्या बाहेरून येणा-या अस्थी विसर्जन धार्मिक कार्यक्रमावर बंदीची मागणी आळंदीकर ग्रामस्थ करत आहेत.

हेही वाचा: पुणे महापालिकेकडून तीनशे बेड्सची सोय; मात्र ऑक्सिजनअभावी सोय थांबली

दरम्यान, यावर दखल घेत स्थानिक प्रशासनातील साबळे आणि जाधव यांनी आज संयुक्त आदेश काढून अस्थी विसर्जन आणि दशक्रिया विधीवर पूर्ण बंदी केली. केवळ आळंदीकर ग्रामस्थांच्याच अस्थी विसर्जन मोजक्या कुटूंबियातच करण्यास मोकळीक आहे. सिद्ध बेट ते भक्त पुंडलिक मंदिर परिसरात हवेली आणि खेड तालुक्याच्या हद्दीतील इंद्रायणी काठी बंदी केली आहे. आळंदी पोलिसांकडून इंद्रायणी काठी दोन पोलिसांची नेमणूक केली जाणार आहे. तर पालिकेकडून वाहनतळ सध्या बंद केले जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी जाधव आणि वरिष्ठ पोलिस निरिक्षक साबळे यांनी सांगितली.

हेही वाचा: बारामती येथे ऑक्सिजन व्हेंटीलेटर बेडचा तुटवडा

loading image