अखिल भारतीय साहित्य संमेलन...अन् आता 'हे' पत्र...संमेलन होणार की नाही?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 मे 2020

कोरोनामुळे आगामी अखिल भारतीय साहित्य संमेलन रद्द होण्याची चिन्हे असतानाच हे संमेलन दिल्लीत घ्यावे, असे पत्र पुण्यातील सरहद संस्थेने साहित्य महामंडळाला पाठविले आहे.
सरहद संस्थेने संमेलन दिल्लीत घेण्यासाठी प्रस्ताव दिलेला आहे.

पुणे : कोरोनामुळे आगामी अखिल भारतीय साहित्य संमेलन रद्द होण्याची चिन्हे असतानाच हे संमेलन दिल्लीत घ्यावे, असे पत्र पुण्यातील सरहद संस्थेने साहित्य महामंडळाला पाठविले आहे.
सरहद संस्थेने संमेलन दिल्लीत घेण्यासाठी प्रस्ताव दिलेला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

परंतु महामंडळाकडून यावर्षी हे संमेलन रद्द करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे संमेलनाच्या आयोजनात खंड पडू नये म्हणून या संस्थेने दिल्लीत संमेलन घेण्यावर आम्ही ठाम आहोत, असे पत्रामध्ये म्हटले आहे. सरहदचे संजय नहार आणि मुख्य संयोजक अविनाश चोरडिया यांनी हे पत्र साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांना पाठविले आहे.

नाशिक आणि अमळनेर येथील साहित्य संस्थांनी संमेलनाच्या आयोजनाची तयारी दर्शविली होती. परंतु महामंडळातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही ठिकाणाहून कोरोनामुळे संमेलन घेणे शक्य नसल्याचे कळविण्यात आले आहे. त्यामुळे दिल्ली येथे संमेलन होणार असल्याचे जाहीर करावे, असे महामंडळाला निमंत्रकांनी सूचित केले आहे. जानेवारी महिन्यापर्यंत कोरोना आटोक्यात आला नाही, तर आयोजनाचा फेरविचार करू असे, त्यांनी म्हटले आहे.

ठाले पाटील यांना पाठविलेल्या पत्रात नहार आणि चोरडिया यांनी म्हटले आहे, की दिल्लीच्या हवामानाचा विचार करता साहित्य संमेलन हे तिथे मार्चच्या शेवटचा आठवडा किंवा एप्रिल महिन्यात घ्यावे लागेल. तोपर्यंत कोरोनावर लसही वा औषध उपलब्ध होऊ शकेल. तसेच सर्व खबरदारीचे उपाय योजून हे संमेलन दिल्लीत घेणे शक्य होणार आहे. महामंडळाने त्यात खंड पडू देऊ नये. यापूर्वी पंजाबमधील घुमान येथे एप्रिल महिन्यातच संमेलन झालेले आहे.

Video : चांदणी चौक येथे अॅसिड गळती; नागरिकांना डोळे चुरचुरण्याचा त्रास!

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, की कोरोनाच्या या विश्वव्यापी संकटाचे सर्वच क्षेत्रावर दूरगामी  परिणाम होणार आहेत. सांस्कृतिक क्षेत्रही त्याला अपवाद नाही. या जीवघेण्या संकटात प्रथम माणूस टिकणे आणि तो पुन्हा उभा राहणे जास्त महत्वाचे आहे. सध्या माणसाच्या अस्तित्वाचा प्रश्न जास्त महत्त्वाचा आहे. दिल्लीचे संयोजक संमेलन घेण्याविषयी ठाम आहेत, ही जमेची बाजू असली, तरी या संकटानंतर समाजाची बदललेली  मानसिकता आणि प्राधान्यक्रम  यांचा संवेदनशीलतेने विचार करून निर्णय घ्यावे लागतील. काळाची पावले ओळखून महामंडळ योग्य  तो निर्णय घेईल.

पुणे : चांदणी चौकात ऍसिडगळती; वाहतूक वळवली

देशात आर्थिक संकट मोठे असणार आहे, याची जाणीव आहे. मात्र, विश्वाला दिशा देण्याची स्वप्ने पाहणाऱ्या मराठी भाषेचा हा साहित्य उत्सव खंडीत होऊ नये. किंबहुना दिल्लीतच त्याची जास्त गरज आहे, अशी आमची ठाम भावना आहे.- संजय नहार (संस्थापक, सरहद पुणे)

- हिंजवडी पोलिसांच्या 'त्या' मेसेजमुळे बांधकाम व्यावसायिकांमध्ये परसली घबराट 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Proposal to hold Marathi Sahitya Sammelan in Delhi