कोंढव्यात स्पा सेंटरच्या नावाखाली देहव्यापार करणारे ताब्यात: 6 महिलांची सुटका

Raid on Spa center running sex racket in kondhwa pune News In Marathi
Raid on Spa center running sex racket in kondhwa pune News In Marathi

कोंढवा: कोंढवा पोलिसांनी स्पा सेंटरच्या नावाखाली अनैतिक देहव्यापार करण्याप्रकरणी एका ईसमावर गुन्हा दाखल करून पिडीत 6 महिलांची त्यांच्या ताब्यामधून सुटका करण्यात आली. याप्रकरणी 'स्पा'चे मालक स्वरूप रवी सबळ (वय 28, रा. वडगावशेरी ), फ्लॅट मालक महिला इंदु व्ही. दुबे ( रा. कोंढवा बुद्रुक) आणि महिला पुनम जहांगीर ( रा. वडगावशेरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील एन. आय. बी. एम. रस्त्यावरील सनश्री वुडस कॅाम्पेक्स मधील एका सदनीकेत 'ला बेला स्पा'' येथे देहव्यापार सुरू असल्याची बातमी पोलिस नायक सुशील धिवार यांना मिळाली. त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरिक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्पामध्ये एका बनावट ग्राहकाला पाठवले. तेथे देहविक्रय होत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर  देहविक्रय करणाऱ्या 6 महिला छाप्या मिळून आल्या. तसेच त्यांच्या सोब स्पाचा मालक रवी सबळ व पुनम जहांगीर मिळून आले.

मेट्रोच्या ट्रॅफिक वॉर्डनचा ट्रकच्या धडकेने मृत्यू 

छापा टाकणाऱ्यांमध्ये लक्ष्मण जगताप, गणेश आगम, अमोल पठारे,किरण मोरे, सुशील धिवार, विकास बांदल यांचा समावेश होता. पुढील तपास पोलिस निरिक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

HSC Exam 2020 : विद्यार्थ्यांनो, परिक्षेला जाताय? वाचा ही महत्वाची बातमी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com