esakal | राज्यातील बाजार समित्या सक्षम करण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद
sakal

बोलून बातमी शोधा

 बाळासाहेब पाटील

"राज्यातील बाजार समित्या सक्षम करण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद"

sakal_logo
By
रवींद्र पाटे ः सकाळ वृत्तसेवा

नारायणगाव : राज्यातील बाजार समित्या सक्षम करण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.शेतमालावर काढणी पश्चात सुविधा निर्माण करण्यासाठी, प्रक्रिया यंत्रणा उभारण्यासाठी या निधीची मदत होणार आहे. आशी माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

हेही वाचा: ज्यांचा मुख्यमंत्री, त्याचेच सरकार - संजय राऊत

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संस्थापक, माजी आमदार सहकारमहर्षी शिवाजीराव काळे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण, शिवछत्रपती महाविद्यालयात उभारलेल्या पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार इनडोअर स्पोर्ट्स हॉल चे उदघाटन व स्मरणिकेचे प्रकाशन माजी केंद्रीय कृषी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे हस्ते झाले.या वेळी सहकार मंत्री पाटील बोलत होते.या वेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्यमंत्री दत्ता मामा भरणे,आमदार दिलीप मोहिते, अशोक पवार, अतुल बेनके, जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, सभापती संजय काळे, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, बाजार समितीचे उपसभापती दिलीप डुंबरे, बाजार समितीचे जेष्ठ संचालक धनेश संचेती,निवृत्ती काळे, संतोष घोगरे, प्रकाश ताजणे, संतोष तांबे, सचिव रुपेश कवडे, उपसचिव शरद घोंगडे आदी उपस्थित होते.

हेही वाचा: पुणे : व्यवसायिकाचे अपहरण केल्याच्या गुन्ह्यात फरारी आरोपीस अटक

सहकार मंत्री पाटील म्हणाले माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम केले आहे. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार खात्या मार्फत सामान्य जनतेला दिलासा देण्याचे काम करत आहे. बाजार समित्या सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने दोन हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.सहकारमहर्षी शिवाजीराव काळे यांनी स्थापन केलेल्या जुन्नर बाजार समितीचे काम उत्कृष्ट आहे. बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा मिळतो. सभापती काळे, आमदार बेनके, सत्यशील शेरकर यांच्या माध्यमातून सहकारात चांगले काम करणारी फळी जुन्नर तालुक्यात तयार झाली आहे.

हेही वाचा: सहकार चळवळीत शिवाजीराव काळे यांचे मोठे योगदान : शरद पवार

सभापती काळे म्हणाले सहकारमहर्षी शिवाजीराव काळे अखेरच्या श्वासा पर्यत कृषिमंत्री पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिले. जुन्नर बाजार समितीत पायाभूत सुविधा निर्माण केल्याने बाजार समितीचे वार्षिक उलाढाल दिडशे कोटि वरून बाराशे कोटी रुपयांची झाली आहे.बाजार समितीचा टोमॅटो उपबजार राज्यात अग्रेसर आहे.

आमदार बेनके म्हणाले शरद पवार यांच्या माध्यमातून तालुक्यात पाच धरणे झाली.तालुक्याच्या शेती सिंचन, सहकार, शिक्षण क्षेत्रातील प्रगतीत शरद पवार यांचे मोठे योगदान आहे.या मुळे पवार साहेब यांच्यावर तालुक्यातील जनतेचे विशेष प्रेम आहे.जलसिंचन सुविधा झाल्याने तालुक्याची प्रगती झाली.

loading image
go to top