Corona Updates: पुण्यात कोरोना जोर धरू लागलाय; दोन दिवसांत वाढले ४९१ रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 19 November 2020

दिवसभरातील नवीन कोरोना रुग्णांच्या तुलनेत गुरुवारी कोरोनामुक्त रुग्णांची संख्या कमी झाली आहे.

पुणे : पुणे जिल्ह्यात मागील दोन दिवसाच्या तुलनेत गुरुवारी (ता.१९) आणखी ४९१ नवे रुग्ण वाढले आहेत. गुरुवारी एकूण ८५९ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. दोन दिवसांपूर्वी म्हणजेच मंगळवारी एकूण ३६८ रूग्ण सापडले होते. हीच संख्या गुरुवारी ८५९ वर पोहोचली आहे. 

KBC मध्ये सुप्रिया सुळेंवर विचारला प्रश्न; लक्ष्मीने जिंकले साडेबारा लाख रुपये​

बुधवारी (ता.१८) दिवसभरातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ७२२ इतकी होती. आजच्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील ४११ जण आहेत. गुरुवारी ८ हजार ३४८ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. तर १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, गुरुवारी ६०३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरातील नवीन कोरोना रुग्णांच्या तुलनेत गुरुवारी कोरोनामुक्त रुग्णांची संख्या कमी झाली आहे. दिवसभरातील एकूण मृत्यूंमध्ये पुणे शहरातील सहा, पिंपरी चिंचवड चार आणि नगरपालिका क्षेत्रातील दोन रुग्णांचा समावेश आहे. जिल्हा परिषद आणि  कॅंन्टोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील एकाही रुग्णाचा गुरुवारी मृत्यू झाला नाही. 

मास्कविना फिरणाऱ्यांनो, आता चौपट दंड होणार; दिल्लीची कोरोनाची स्थिती गंभीर!

पुणे जिल्ह्यात सध्या विविध रुग्णांलयात ३ हजार ७९३ कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. याशिवाय ५ हजार ८७२ रुग्णांवर त्यांच्या घरातच उपचार करण्यात येत आहेत. पुणे जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता ३ लाख ३३ हजार ७२६ झाली आहे. यापैकी आतापर्यंत ३ लाख १५ हजार ९९४  कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत ८ हजार २३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील ३८५ रुग्ण आहेत.

गुरुवारी पिंपरी चिंचवडमध्ये १७९, जिल्हा परिषद क्षेत्रात २१६, नगरपालिका
क्षेत्रात ४० आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात १३ नवे रुग्ण सापडले आहेत. नवे कोरोना रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही बुधवारी (ता.१८) रात्री ८ वाजल्यापासून गुरुवारी (ता.१९) रात्री आठ वाजेपर्यंतची आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Pune 859 new corona patients found on Thursday 19 November 2020