esakal | पुणे : अकरावीच्या तिसऱ्या फेरीत ९ हजार २६१ विद्यार्थ्यांना प्रवेश
sakal

बोलून बातमी शोधा

Admission

पुणे : अकरावीच्या तिसऱ्या फेरीत ९ हजार २६१ विद्यार्थ्यांना प्रवेश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : अकरावी प्रवेशाच्या तिसऱ्या नियमित फेरीत नऊ हजार २६१ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड झाली आहे. या फेरीत दोन हजार ३१४ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले आहे. तिसऱ्या फेरीत प्रवेशासाठी महाविद्यालये ॲलॉट झालेल्या विद्यार्थ्यांना बुधवारपर्यंत (ता.१५) प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.

हेही वाचा: हौशी पुणेकराची कमाल, घरातच साकारला मेट्रो प्रकल्पाचा देखावा !

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीच्या प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. या प्रवेश प्रक्रियेतंर्गत तिसऱ्या नियमित फेरीतील प्रवेशाची यादी सोमवारी जाहीर झाली. या फेरीत ५६ हजार ६३५ जागा उपलब्ध होत्या, या जागांसाठी एकूण २९ हजार ५०५ विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. त्यातील नऊ हजार २६१ विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी महाविद्यालये ॲलॉट झाली आहेत.तिसऱ्या फेरीत दोन हजार ३१४ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे, दोन हजार १४३ विद्यार्थ्यांना दुसऱ्या पसंतीक्रमाचे, तर एक हजार ३४० विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले आहे.

हेही वाचा: चेंबर साफ करीत वाहतुक पोलिसाने पाण्याला करुन दिली मोकळी वाट !

तिसऱ्या फेरीत शाखानिहाय महाविद्यालये ॲलॉट झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या :

शाखा : उपलब्ध जागा : एकूण अर्ज : विद्यार्थ्यांची संख्या

  • कला : १०,५०१ : २,६९२ : १,०३७

  • वाणिज्य : २२,७७४ : ११,८८८ : ३,८६५

  • विज्ञान : २०,५४५ : १४,५१३ : ४,२१६

  • एचएसव्हीसी : २,८१५ : ४१२ : १४३

  • एकूण : ५६,६३५ : २९,५०५ :  ९,२६१

हेही वाचा: सरकारी कर्मचाऱ्यांना कोरोनाचे दोन डोस बंधनकारक

प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक :

तपशील : कालावधी

  • महाविद्यालये ॲलॉट झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ‘प्रोसिड फॉर ॲडमिशन’वर क्लिक करणे, प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे, प्रवेश निश्चित करणे : १५ सप्टेंबर (सायंकाळी सहा वाजेपर्यंत)

  • कनिष्ठ महाविद्यालयांनी तिसऱ्या फेरीतील प्रवेशानंतर रिक्त जागांचा तपशील संबंधित संकेतस्थळावर अपलोड करणे : १५ सप्टेंबर

  • महाविद्यालयांनी कोट्यांतर्गत जागा केंद्रीय प्रवेशासाठी प्रत्यार्पित करणे : १६ सप्टेंबर (रात्री आठ वाजेपर्यंत)

  • रिक्त जागांचा तपशील जाहीर करणे : १६ सप्टेंबर (रात्री दहा वाजता)

loading image
go to top