Andekar Gang: कशी सुरू झाली आंदेकर टोळीची दहशत? भांड्याचा व्यवसाय ते अंडरवर्ल्ड कनेक्शन! पुण्यात तिसरी हत्या... ४ पिढ्यांचा इतिहास

Pune Andekar Family Underworld Connection: भांड्याच्या व्यवसायातून सुरू झालेलं आंदेकर कुटुंब आज गुन्हेगारी, खून, टोळीयुद्ध आणि राजकारणाच्या अंधाऱ्या इतिहासाशी जोडले गेले आहे.
Andekar gang Pune crime history

Andekar gang Pune crime history

esakal

Updated on

पुणे हे शिक्षण, संस्कृती आणि आधुनिक विकासासाठी ओळखले जाणारे शहर असले, तरी गेल्या काही दशकांत शहराच्या मध्यवर्ती भागात गुन्हेगारीच्या सावल्या देखील गडद होत गेल्या. त्यामध्ये आंदेकर टोळीचे नाव विशेष चर्चेत राहिले आहे. भांड्यांच्या व्यवसायातून सुरुवात झालेल्या या कुटुंबाचा प्रवास पुढे दहशत, खून आणि स्थानिक राजकारणापर्यंत पोहोचल्याचे अनेक घटनांमधून समोर आले. वनराज आंदेकर यांच्या हत्येनंतर या टोळीभोवतीचे वाद अधिक तीव्र झाले. त्यानंतर आयुष कोमकर, गणेश काळे आणि आता अक्षय म्हस्के याच्यावरील हल्ल्यामुळे पुन्हा एकदा आंदेकर टोळीच्या काळ्या इतिहासाची चर्चा शहरभर रंगू लागली आहे. विशेष म्हणजे, या रक्तरंजित संघर्षात आंदेकर कुटुंबातील नातलगांचाही बळी गेला आहे. १ सप्टेंबर २०२४ रोजी वनराज आंदेकर यांची हत्या झाल्यानंतर सुरू झालेली ही साखळी अद्याप थांबलेली नसल्याने शहरातील कायदा-सुव्यवस्थेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com