

फोटो ः नौशाद शेख
सिद्धांत दोशी
-------------------
पूना क्लब, आर्यन्स स्पोर्ट्सची आगेकूच कायम
डेक्कन करंडक टी-२० क्रिकेट
पुणे, ता. १९ ः डेक्कन जिमखाना क्लब आयोजित डेक्कन जिमखाना करंडक’ टी-२० क्रिकेट स्पर्धेत पूना क्लब आणी आर्यन्स स्पोर्ट्स क्लबने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळविले.
डेक्कन जिमखाना क्लबच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत नौशाद शेखने केलेल्या नाबाद ८३ धावांच्या जोरावर पूना क्लबने ग्लोरी स्पोर्ट्स संघाचा चार गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना ग्लोरी स्पोर्ट्सने सहा बाद १७४ धावा केल्या. या वेळी पीयूष सोहणेने ५५ चेंडूंत आठ चौकार आणि सहा षटकारांसह ९८ धावांची खेळी केली. पीयूष ने अक्षय पंचरीयाच्या साथीत पहिल्या विकेटकरिता ११६ धावांची भागीदारी केली. प्रत्युत्तर देताना पूना क्लबने सहा बाद १७५ धावा करून विजय मिळविला. त्यात महत्वाचा वाटा नौशाद शेखने ३८ चेंडूंत नऊ चौकार आणि चार षटकारांसह केलेल्या नाबाद ८३ धावांचा होता. नौशाद शेखला अजिंक्य नाईक आणि अकिब शेखने सुरेख साथ दिली कौनलसिंगने चार गडी बाद केले.
दुसऱ्या लढतीत सिद्धांत दोशीच्या नाबाद ९२ धावांच्या जोरावर आर्यन्स क्लबने पारसी जिमखाना संघाचा ११४ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना आर्यन्स क्लबने सात बाद २२५ धावा केल्या. या वेळी सिद्धांत दोशीने ५३ चेंडूंत दहा चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद ९२ धावांची, तर आतिश कुंभारने २२ चेंडूंत ५० धावांची केलेली खेळी उपयुक्त ठरली. प्रत्युत्तर देताना पारसी जिमखानाचा डाव १११ धावांवर आटोपला. या वेळी योगेश चव्हाणने केलेली ४९ धावांची खेळी अपुरी पडली. आतिश कुंभार, रोशन वाघसरे आणि सुमीत मरकलीने प्रत्येकी दोन गडी बाद केले. या स्पर्धेतील ‘सामन्याचा मानकरी’ हा मान नौशाद शेख (पूना क्लब) आणि सिद्धांत दोशीने (आर्यन्स स्पोर्ट्स क्लब) मिळविला.
संक्षिप्त धावफलक ः
१) ग्लोरी स्पोर्ट्स - (२० षटकांत) ६ बाद १७४ (पीयूष सोहणे ९८, अक्षय पंचरीया ३९, सुरज कार्डीले २५, श्रीकांत मुंढे २-२३, दिव्यांग हिंगणेकर २-४८) पराभूत विरुद्ध पूना क्लब - (१६.२ षटकांत) सहा बाद १७५ (नौशाद शेख नाबाद ८३, अजिंक्य नाईक ३०, अकिब शेख २१, कौनल सिंग ४-४६).
२) आर्यन्स स्पोर्ट्स क्लब - (२० षटकांत) सात बाद २२५ (सिद्धांत दोशी नाबाद ९२, आतिश कुंभार ५०, भरत पुरोहित ३२, समर्थ भोसले २-३९, सौरभ पवार २-५३) वि.वि. पारसी जिमखाना- (१७.५ षटकांत) सर्वबाद १११ (योगेश चव्हाण ४९, आतिश कुंभार २-१२, सुमीत मरकली २-१९, रोशन वाघसरे २-२१).
------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.