Pune : सिंहगडच्या ‘लहू’ ची, माऊंट एव्हरेस्टला गवसणी

समाजातील दानशूर लोकांकडे मदत मागायला सुरु केली. त्यातही अनंत अडचणी येत होत्या त्यातच २०२२ चा सिझन संपला. पण त्याने हार मानली नाही. यंदाच्या २०२३ च्या सिझनला जायचेच हा निश्चय करून निधी जमा करणे सुरु ठेवले.
-लहू उघडे, गिर्यारोहक
-लहू उघडे, गिर्यारोहक sakal

खडकवासला - जगातील सर्वोच्च असणारा शिखराला ३४ वर्षाचा सिंहगडच्या वाघराने म्हणजे लहू उघडे याने मंगळवारी २३ मे २०२३ रोजी सकाळी साडे आठ वाजता पहिल्या प्रयत्नात माऊंट एव्हरेस्टला गवसणी घातली.

एव्हरेस्टच्या माथ्यावरती गेल्यावर त्याने तिरंगा, भगवा ध्वज फडकवला. छत्रपती शिवरायांची मूर्ती त्यांनी तेथे तळहातावर घेऊन आकाशाच्या दिशेने उंचावत आपली मोहीम फत्ते झाल्याची त्यांनी जाहीर केले. कुटुंब नातवाईक, मित्र परिवार प्रत्येकाच्या मनाला लागलेली हुरहुर लागली होती. त्याच्या मोहीम फत्ते च्या बातमीने सर्वांनी जल्लोष केला.

सिंहगडच्या पायवाटेला आई सोबत लहू लहानपणापासून तो काकडी, लिंबूपाणी विकत असे. हॉटेलचे साहित्य घरी ने आणि करताना त्याचं सह्याद्रीशी घट्ट नातं जडत गेले ते कायमचं. सह्याद्रीतील अनेक अवघड शिखर कडे कपारी सर करताना… त्याला स्वप्न पडू लागली… ती जगातील सर्वोच्च शिखराची… ही स्वप्न पडणं आणि स्वप्न पाहणं म्हणजेच फुकटचे नव्हते.

-लहू उघडे, गिर्यारोहक
Mumbai Local News : पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांनी थांबवली एसी लोकल, कारण...

ते जिकरीचे आणि खर्चिक काम… आव्हान तर स्वीकारलं. सराव सुरू केला… या स्वप्नांचा पाटलाग तो करीत होता. अखेर ते स्वप्न लहू ने मंगळवारी सत्यात उतरवलच.

सिंहगड छत्रपती शिवरायांच्या काटक मावळ्यांची भूमी, डोंगरदऱ्यामुळे उपजतच ते सर करण्याची वृत्ती. हा साहसी खेळ लहू उघडे यास बालपणीपासूनच आकर्षित झाला होता. सह्याद्रीतील त्यानंतर हिमालय व अनेक शिखरे सर केल्यानंतर खुणावत होते ते, जगातील सर्वोच्च शिखर. पण अनंत अडचणी पुढे उभ्या होत्या. शारीरिक तंदुरुस्ती व चढाईचा सराव व्हावा.

यासाठी दिवसातून दोन वेळा पाठीवर वीस किलो वजन घेऊन सिंहगड किल्ला चढायचा आणि उतरायचा हा दिनक्रम गेली दोन वर्ष सुरु होता. त्यामुळे शारीरिक व मानसिक तयारी जबरदस्त झाली होती. परंतु सर्वात मोठी अडचण होती ती मोहिमेसाठी आवश्यक निधीची.

नेपाळ सरकारची फी, शेर्पा व इतर खर्च धरून एव्हरेस्ट मोहिमेसाठी साधारण ३०-३२ लाख रुपये खर्च येतो. एवढा मोठा निधी उभारायचा म्हणजे एव्हरेस्ट चढण्यापेक्षाही कठीण काम होते. मनातील जिद्द स्वस्थ बसू देत नव्हती.

-लहू उघडे, गिर्यारोहक
Pune News : गोखलेनगर'चे शहीद तुकाराम ओंबळे मैदान बनले मद्यपींचा अड्डा; महिलांमध्ये असुरक्षेची भावना

समाजातील दानशूर लोकांकडे मदत मागायला सुरु केली. त्यातही अनंत अडचणी येत होत्या त्यातच २०२२ चा सिझन संपला. पण त्याने हार मानली नाही. यंदाच्या २०२३ च्या सिझनला जायचेच हा निश्चय करून निधी जमा करणे सुरु ठेवले. अनेक जाणत्या अजाणत्या हातांनी मदत केली. सर्वात कमी देणगी होती ५० रुपये. अनेकांनी मोठी मदत केली. आणि मोहिमेचा मार्ग खुला झाला.

-लहू उघडे, गिर्यारोहक
Mumbai : डोंबिवली एमआयडीसीतील रस्ता लालेलाल; रस्त्यावर केमिकल मिश्रीत सांडपाणी

हा सिझन वाया जाऊ नये म्हणून त्याने पहिले नेपाळ गाठले. पण अडचणी पिच्छा सोडत नव्हत्या. मोहिमेसाठी भरायला लागणाऱ्या फी मध्ये काही रक्कम कमी होती. आणि ती मित्रमंडळी मागून पाठवणार होते. सोबतच्या टीमचे सर्वांचे पैसे जमा करून झाले होते. पण लहूची आवश्यक रक्कम अजूनही जमा होत नव्हती.

पत्नी, मित्र अनेक ठिकाणी फिरून मदतीसाठी अपील करत होते. शेवटी मुदत संपण्याच्या दोन दिवस आधी आवश्यक रक्कम जमा झाली. आणि एव्हरेस्टचा मार्ग खुला झाला. सुरेंद्र शेळके या दिग्गज गिर्यारोहकाच्या मार्गदर्शनाखाली व तीव्र ईच्छाशक्तीच्या बळावर लहू आज एव्हरेस्टवीर ठरला आहे. कष्ट उपसण्याची तयारी असेल तर एव्हरेस्टही सर होऊ शकते. असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

लहू ची कौटुंबिक पार्श्वभूमी

लहूची आई सोनाबाई याचे पायवाटेला मध्यावर त्याचे हॉटेल आहे. शनिवार- रविवारी सिंहगड पायथा आतकरवाडीतून अनेकजण व्यायामासाठी गडावर येतात. त्यांच्यासाठी तो लिंबू- सरबतपासून पिठलं भाकरी तो विकायचा. आईला मदत करताना शिक्षण घेताना त्याची जगण्याची धडपड सुरु होती. जन्मापासून वडिलांचे छत्र नाही.

-लहू उघडे, गिर्यारोहक
Mumbai Accident : कल्याणमध्ये कंटेनर आणि रिक्षांची जोरदार धडक दोन रिक्षाचालक जखमी; चालकाविरोधात गुन्हा दाखल

मोठा भाऊ मुंबईला कामाला आहे. मोठ्या दोन बहिनींची लग्ने झालेली आहेत. लहूचा मोठा भाऊ मुंबईला कामाला आहे. मोठ्या दोन बहिनींची लग्ने झालेली आहेत. त्यामुळे, आईची जबाबदारी सांभाळत. गडावर सरबत विकत खानापूरच्या शाळेत शिक्षण घेतले. दहावीनंतर आयटीआय केला. नोकरी न मिळाल्याने पाण्याचे जार वाहतूक करणाऱ्या गाडीवर हमाल म्हणून काम केले.

सचिन शिंदे व अमित सिंग भेटले. यांनी पर्वतारोहणचे शिक्षण घेण्याचे सुचविले. संरक्षण विभागाच्या माध्यमातील जम्मू काश्मीरसह येथील पहिले प्रशिक्षण घेतले.

एस.एल.ऍडव्हेंचरच्या माध्यमातून साहसी क्रीडा प्रकार- गिर्यारोहणातील अवघड मोहिमा एक हजार ८०० फुटी कोकणकडा रॅपलिंग, लिंगाणा, देवकुंड रॅपिल्लिंग, जीवधन वानरलिंगी व्हॅली क्रॉसिंग, वजीर, तैल- बैल, भैरवगड असंख्य वेळा सुरक्षिततेला धरून नवोदित गिर्यारोहकांसाठी केल्या आहेत. त्यातून मिळणाऱ्या पैशातून आईला हातभार लावला.

पर्वतारोहणचे पुढील प्रशिक्षण अरुणाचल प्रदेश व लेह येथे घेतले. नवोदितांना गिर्यारोहणाचे धडे दिले. त्यांना पर्वतारोहणाचे प्रशिक्षणास पाठवले. त्यांनी प्रशिक्षणांतर्गत अ श्रेणी मिळवली आहे.

त्याने राष्ट्रीय पातळीवरील यशस्वी चढाई केलेले पर्वत

भागीरथी २ - ६,५१२ मीटर

माऊंट युनाम- ६ ,१११ मीटर

फ्रेंडशिप पीक - ५,२८९ मीटर

-लहू उघडे, गिर्यारोहक
Pune News : खाद्य पदार्थाच्या स्टॉलला लाथ मारण्याचं प्रकरण भोवलं; आता अतिक्रमण विभागासाठी...

सह्याद्रीतील सुळक्यांवर यशस्वी चढाई

खडापारशी - 450 फुट

वजीर - 200 फुट

ड्युक्स नोज - 250 फुट

लिंगाणा - 800 फुट

तैलबैल - 180 फुट

बाण- 750 फुट

-लहू उघडे, गिर्यारोहक
Mumbai : कल्याण शहरात रस्त्याच्या मधोमध वाहन पार्कींग; वाहतूक कोंडीवर पोलिस काय करत आहेत?

एव्हरेस्टला जाण्यापूर्वी तो म्हणाला होता…

“माऊंट एव्हरेस्ट सर केल्यावर स्थानिक पर्वतारोहण वाढविण्यावर भर देणार आहे. देशातील पर्वतारोहण, सह्याद्री, सातपुडा पर्वत रांगामध्ये मोठी आव्हाने आणि संधी आहे. असे स्थानिक पर्वतारोहण वाढल्यावर त्या परिसरात रोजगार वाढेल. ते तरुण गुन्हेगारीकडे वळणार नाहीत.”

-लहू उघडे, गिर्यारोहक

श्रीराम आयोध्येला जाताना त्याची कौशल्या हिने देखील कोणता विचार केला नव्हता. आपण तर शिवबाची माणसं लढाई करायचं काम आपलं. त्यामुळे आम्ही त्याच्या मोहिमे फत्ते करून तो येणार याची आम्हाला खात्री होती.

अशा माऊंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या लहू उघडे यांला आज ही त्याला आपल्या मदतीची गरज आहे.

Bank Details:-

Lahu Kondiba Ughade

Bank of Maharashtra

A/c number - 60407413318

Branch - Khanapur

IFSC Code - MAHB0000473

Phone Pay & Gpay - 9623555676

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com