लॉकडाऊनमध्येही सोन्याला झळाळी; अक्षय तृतीयेनिमित्त पुणेकरांची ऑनलाईन सोने खरेदी!

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 26 April 2020

दरवर्षी अक्षय तृतीयेला पुण्यात सुमारे अडीचशे कोटी रुपयांचे सोने खरेदी केले जाते. मात्र, लाॅकडाऊनमुळे रविवारी केवळ १० टक्के व्यवसाय झाला आहे.

पुणे : अक्षय तृतीया म्हणले की पुण्यातील सराफी पेढ्या ओसंडून वहात. मात्र, यंदा 'कोरोना'मुळे पेढ्यांचे टाळे उघडले नसले तरी ऑनलाईन सोने खरेदीला पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. सराफांनाही दिलासा मिळाला आहे. हिंदू धर्मातील साडेतीन शुभ मुहूर्तापैकी अक्षय तृतीया हा एक शुभ मुहूर्त मानला जातो.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या दिवशी सोने खरेदी केल्याने घरात समृद्धी राहते, अशी भावना असल्याने दरवर्षी सोने खरेदीला सराफी पेढ्या ग्राहकांनी भरलेल्या असतात. यावेळी कोरोनाचे संकट निर्माण झाल्याने बाजारपेठ बंद आहे. त्यामुळे सराफ व्यापार्यांनी ऑनलाईन आणि फोन बुकींगद्वारे सोने खरेदीची संधी ग्राहकांना उपलब्ध करून दिली. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कोणी करनावळीवर ५० टक्के सूट दिली, तर खरेदीत १० टक्क्यांपर्यंत सूट दिली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

रांका ज्वेलर्सचे वस्तूपाल रांका म्हणाले, "अक्षय तृतीयेला सोने खरेदी हा ग्राहकांसाठी श्रद्धेचा विषय असतो. त्यामुळे आम्ही ऑनलाईन व फोन द्वारे बुकिंग घेत आहोत. आज ४६ हजार ५०० भाव असला तरी ४५ हजार ५०० हा भाव फिक्स करून बुकींग घेतले आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ५०० पेक्षा जणांनी १ ग्रॅम पासून ते ५० ग्रॅम पर्यंत सोने घेतले आहे. ग्राहकांनी पूर्ण पैसे भरले की त्यांना खरेदीत ई-प्रमाणपत्र दिले जात असून, लाॅकडाऊन संपले की सोने दिले जाणार आहे. या कालावधीत भाव कमी झाले तर ग्राहकांना त्याचा परतावा केला जाणार आहे.''

- Duty First : कॅन्सर असतानाही जिगरबाज आयपीएस ऑफिसरने केले कोरोनाशी दोन हात!

चंदुकाका सराफ ज्वेलर्सचे सिद्धार्थ शहा म्हणाले, "वर्षानुवर्षे जे ग्राहक थेट दुकानत येऊन सोने घेत होते ते आज फोनवर बुकींग घेत आहेत. आमचे ग्राहक संपर्कात रहावेत यासाठी बुकींग घेतल्या. यास अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला आहे. करनावळीवर ५० टक्के सूट देण्यात आली आहे.''

- लॉकडाऊन वाढणार? इतर राज्यात अडकलेल्या नागरिकांना आणण्यासाठी राज्य सरकारच्या हालचाली

दरवर्षीच्या तुलनेत  १० टक्के खरेदी

दरवर्षी अक्षय तृतीयेला पुण्यात सुमारे अडीचशे कोटी रुपयांचे सोने खरेदी केले जाते. मात्र, लाॅकडाऊनमुळे रविवारी केवळ १० टक्के व्यवसाय झाला आहे. यामध्ये ८५ टक्के ग्राहक शुद्ध सोने खरेदी करत आहेत, तर उर्वरीत १५ टक्के दागिने बुक करत आहेत. यंदा लाॅकडाऊन असल्याने खरेदी कमी असली तरी हा प्रतिसाद अपेक्षेपेक्षा जास्त आहे, असे रांका यांनी सांगितले.

आणखी वाचा - पुण्यात कोथरूडकरांनी रोखला कोरोना राक्षस


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune citizens bought gold online on the occasion of Akshay Tritiya in Lockdown period