पुण्यात गारठा कमी; उत्तर भारतातील वातावरणात बदलाचा परिणाम 

पुण्यात गारठा कमी; उत्तर भारतातील वातावरणात बदलाचा परिणाम 

पुणे - पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून असलेला गारठा शुक्रवारी कमी झाला. गुरुवारी सकाळी असलेला किमान तापमानाचा पारा १०.३ वरून शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत १२.१ अंश सेल्सिअसपर्यंत वाढला. पुढील तीन ते चार दिवसांमध्ये किमान तापमान १४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला. 

गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमान ११ अंश सेल्सिअसच्या आतमध्ये नोंदले जात होते. गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी सकाळपर्यंतच्या किमान तापमान १.८ अंश सेल्सिअसने वाढले. येत्या शनिवारी (ता. ६) सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील चार दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहील. मात्र, किमान तापमान १२ ते १४ अंश सेल्सिअस दरम्यान नोंदले जाईल, असा अंदाज वर्तविण्यात आला. 

उत्तर भारतातील वातावरणात सतत होणाऱ्या बदलाचा परिणाम थंडीवर होत आहे. मात्र राज्यात अजूनही थंडी कायम आहे. येत्या काही दिवसांत थंडीत काही अंशी चढ-उतार होतील. शुक्रवारी (ता. ५) राज्यातील सर्वांत कमी तापमान ब्रह्मपूरी येथे ११.२ अंश सेल्सिअस नोंदले गेले. 

राजस्थानच्या वायव्य व परिसर आणि जम्मू आणि काश्मीरच्या परिसरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून चक्रीय स्थिती असल्याने पावसासाठी पोषक वातावरण आहे. यामुळे उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, हरियाना, चंडीगड, दिल्ली, जम्मू आणि काश्मीर, लडाख, उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात अवकाळी पाऊस पडत आहे. उत्तर केरळची किनारपट्टी ते दक्षिण गुजरात या दरम्यान कमी दाबाचा पट्टा अजूनही कायम आहे. यामुळे कोकणातील मुंबई, ठाणे, डहाणू भागांतील थंडी कमी होऊन किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे. 

मध्य महाराष्ट्रातील काही भागात अजूनही थंडी आहे. किमान तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापूर भागांतही किंचित थंडी असल्यामुळे या भागात १५ ते १७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान आहे. परभणी कृषी विद्यापीठाच्या आवारात सर्वांत कमी ११.३ अंश सेल्सिअस, तर बीडमध्ये १७.१ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले. विदर्भातही थंडी कायम आहे. त्यामुळे अमरावती, गोंदिया, नागपूर, वर्धा, चंद्रपूर भागांत ११ ते १२ अंश सेल्सिअस एवढे किमान तापमान आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com