विश्वजीत कदम यांच्या मंत्रिपदासाठी पुणे काँग्रेसचे 'लॉबिंग

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 4 December 2019

पुण्यातील काँग्रेसचे नगरसेवक, 12 ब्लॉक अध्यक्ष आणि विविध सेलचे अध्यक्ष मुंबईला रवाना झाले आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची आज भेट घेणार आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळात पुणे जिल्ह्यातील भोरचे आमदार संग्राम थोपटे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. तसेच विश्वजित कदम यांच्या नावाचीही चर्चा आहे.

पुणे : विश्वजीत कदम यांचा मंत्रिपदाचा दावा बळकट करण्यासाठी काँग्रेसमधील एक गट कार्यरत आहे. यात पुणे काँग्रेसमधील नेत्यांनी पुढाकार घेतला असून, काँग्रेस नेत्यांनी मुंबई गाठली आहे. पुण्यात संग्राम थोपटे यांच्या मंत्रिपदाचा दावा भक्कम मानला जात असल्यामुळं विश्विजत कदम यांचा गट ताकद दाखवण्याच्या प्रयत्नात असल्याचं बोललं जातयं. 

मध्य रात्री उठून मेकअप करायला लावायचे अन्...

पुण्यातील काँग्रेसचे नगरसेवक, 12 ब्लॉक अध्यक्ष आणि विविध सेलचे अध्यक्ष मुंबईला रवाना झाले आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची आज भेट घेणार आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळात पुणे जिल्ह्यातील भोरचे आमदार संग्राम थोपटे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. तसेच विश्वजित कदम यांच्या नावाचीही चर्चा आहे. मात्र आपला दावा भक्कम करण्यासाठी शहरातील सर्व ब्लॉक अध्यक्ष, 10 नगरसेवक, महिला, युवक, सेवादल, इंटक, युवक आदी विविध सेलच्या अध्यक्षांना मुंबईत पोचण्याचा निरोप विश्वजीत यांच्याकडून देण्यात आला आहे, असे सांगण्यात आले आहे. दुपारी थोरात यांना भेटून ही मंडळी विश्वजीत यांना मंत्रीपद मिळावे म्हणून प्रयत्न करणार आहेत. 

खाते वाटप हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार : जयंत पाटील 

विश्वजीत यांनी 2014 मध्ये पुण्यातून लोकसभा निवडणूक लढविली होती. त्यानंतरही ते शहर काँग्रेसमध्ये सक्रिय होते. त्या मुळे पुण्यातील काँग्रेस पाठिशी आहे, हे दाखविण्याचा कदम यांचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. वडील पतंगराव कदम यांच्या निधनानंतर विश्वजित कदम सांगली जिल्ह्यातून कडेगाव मतदारसंघातून बिनविरोध निवडून आले होते. त्यानंतर यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी कडेगावमध्ये निर्विवाद विजय मिळवला. 

छत्तीसगडमध्ये जवानाचा अंदाधुंद गोळीबार; सहा जवान ठार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Congress lobbying for Vishwajit Kadam cabinet