पुणे : महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी ७ लाख शुल्क

पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून वर्षाला ७ लाख रुपये शुल्क घेतले जाणार आहे.
Pune Municipal Corporation
Pune Municipal Corporationsakal

पुणे : पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून वर्षाला ७ लाख रुपये शुल्क घेतले जाणार आहे. याबाबतचा निर्णय आज पुणे महापालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्टच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

महापालिकेतर्फे वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले जाणार आहे. हे महाविद्यालय तयार करताना त्याच्या कामात अनेक त्रुटी असल्याचे राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) त्यास परवानगी देण्यास नकार दिला होत. गेल्या दोन महिन्यात महापालिकेने केलेल्या तयारीमुळे सोमवारी (ता. ७) १०० पदवी (एमबीबीएस) प्रवेशासाठी परवानगी दिल्याने महापालिकेला मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आता महाविद्यालयाची शुल्क निश्चिती करणे, प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्‍यक परवानगी घेणे, विद्यार्थ्यांसाठी सुविधा पुरविणे या कामांना गती आली आहे.

Pune Municipal Corporation
जोतिबा डोंगरावर ई पास बंद; पूर्ण गावचा मंदिरासमोर ठिय्या

महापालिकेत आज (ता. ११) महापालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्टचे अध्यक्ष तथा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी शुल्क निश्‍चित करण्यासाठी बैठक घेतली. यामध्ये महाविद्यालयाच्या तयारीचा आढावा घेतानाच खर्च किती होऊ शकतो, खासगी वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय महाविद्यालयांचे शुल्क किती यावर चर्चा झाली. शासकीय दर हा महापालिकेला परवडणारा नाही, त्याचा खर्चाचा पूर्ण भार घेणे शक्य नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून जेवढा खर्च होतो त्याप्रमाणात शुल्क घेतले जावे यावर एकमत झाले. वैद्यकीय महाविद्यालयाचे शिकवणी शुल्क हे सात लाख रुपये प्रति वर्षासाठी असेल असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. मात्र, विद्यार्थ्याचे वसतीगृह व इतर सुविधांचे शुल्क हे पुढच्या बैठकीत निश्‍चीत होण्याची शक्यता आहे.

महापालिकेने शुल्क निश्‍चीत केल्यानंतर आता शुल्क नियंत्रण प्राधिकरणाची (एफआरए) मान्यता घेण्यासाठी प्रस्ताव पाठवला जाणार आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशाचा मार्गही मोकळा होण्याची शक्यता आहे.

‘‘वैद्यकीय महाविद्यालये शुल्क किती असावे यावर चर्चा करण्यासाठी आज दुसरी बैठक झाली. त्यामध्ये खर्चाचा विचार करून व विद्यार्थ्यांना परवडेल असे वर्षाला ७ लाख रुपये इतके शुल्क निश्‍चीत केले आहे. त्याबाबत पुढील कार्यवाही प्रशासनाकडून सुरू केली आहे. तर वसतीगृह व इतर शुल्काचा निर्णय लवकरच घेतला जाईल.’’

- मुरलीधर मोहोळ, महापौर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com