...म्हणून प्रवासी वैमानिकानेच केले पुणे-दिल्ली विमानाचेे लॅडिंग

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 डिसेंबर 2019

पुणे : दाट धुक्‍यामध्ये विमान उतरविण्यासाठी आवश्‍यक प्रशिक्षणच वैमानिकाला दिलेले नव्हते. त्यामुळे विमानाला झालेला विलंब टाळण्यासाठी एका प्रवाशानेच पुढाकार घेतला. संबंधित विमान कंपनीनेही त्याच्याकडे कॉकपीटची जबाबदारी सोपविली आणि त्याने सुरक्षितपणे हे विमान दिल्लीत उतरविले. हा प्रवासी कंपनीचा प्रशिक्षित वैमानिकच (कॅट 3 बी) होता. 

Video : मजूराचा पाय बाहेर खेचणार तेवढ्यात आम्ही देखील गाडले गेलो....  

पुणे : दाट धुक्‍यामध्ये विमान उतरविण्यासाठी आवश्‍यक प्रशिक्षणच वैमानिकाला दिलेले नव्हते. त्यामुळे विमानाला झालेला विलंब टाळण्यासाठी एका प्रवाशानेच पुढाकार घेतला. संबंधित विमान कंपनीनेही त्याच्याकडे कॉकपीटची जबाबदारी सोपविली आणि त्याने सुरक्षितपणे हे विमान दिल्लीत उतरविले. हा प्रवासी कंपनीचा प्रशिक्षित वैमानिकच (कॅट 3 बी) होता. 

Video : मजूराचा पाय बाहेर खेचणार तेवढ्यात आम्ही देखील गाडले गेलो....  

पुणे विमानतळावरून शनिवारी (ता.30) सकाळी साडेसात वाजता इंडिगो कंपनीचे विमान (ई) दिल्लीला रवाना होणार होते. पण दिल्लीतील दाट धुक्‍यामध्ये हे विमान उतरविण्यासाठीचे आवश्‍यक प्रशिक्षणच (कॅट 3 बी) वैमानिकाला नव्हते. त्यामुळे उड्डाणाला विलंब टाळण्यासाठी संबंधित वैमानिक बदलण्यात आला.

माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी रुग्णालयात दाखल; डोक्याला झाली इजा

एका प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार, इंडिगो कंपनीचे विमान सकाळी साडेसात वाजता पुण्यातून उड्डाण करणार होते. पण दिल्लीमध्ये दाट धुके असल्याने विमान उड्डाणाला विलंब होत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. ही परिस्थिती लक्षात घेत विमानातीलच एक प्रवासी पायलट बरोबर चर्चा करू लागला. त्या प्रवाशानेच इतर प्रवाशांना दिल्लीतील परिस्थिती, वैमानिक याबाबत माहिती दिली.

जेजुरीच्या चंपाषष्ठी उत्सवात असे भरले रंग...

वैमानिकाकडे दाट धुक्‍यामध्ये विमान उतरविण्याचे प्रशिक्षण नव्हते. धुके कमी होईपर्यंत विमानाचे उड्डाण होणार नसल्याचे त्याने स्पष्ट केले. मात्र, प्रवासी स्वतः प्रशिक्षित वैमानिक असल्याने त्याने कंपनीकडे विमान उड्डाणाची परवानगी मागितली होती. तो वैमानिकही त्याच कंपनीचा असल्याने सर्व आवश्‍यक परवानग्या घेऊन वैमानिक बदलण्यात आला. पण त्याचे 'फ्लाइट ड्यूटी टायमिंग लिमिटेशन' पूर्ण होत नव्हते. त्यामुळे विमान काही वेळ थांबवून सव्वा नऊच्या सुमारास त्याचे उड्डाण झाले. दिल्ली विमानतळावर सुरक्षितपणे विमान उतरल्यानंतर सर्व प्रवाशांना संबंधित वैमानिकाचे आभारही मानले. तसेच प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून त्याने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केल्याचे प्रवाशाने सांगितले. 

म्हणून महापोर्टलच्या परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांनी घातला गोंधळ

''दिल्लीमधील वातावरण सुधारेपर्यंत प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून इंडिगोच्या "कॅट 3 बी' प्रशिक्षण पूर्ण केलेल्या दुस-या कॅप्टनला विनंती करण्यात आली. हा बदल करण्यापूर्वी सर्व आवश्‍यक परवानग्या घेण्यात आल्या.''
- इंडिगो एअरलाईन्स  
 

पुण्यासह 'या' पाच ठिकाणी असणार एसटीच्या 'ई-बस चार्जिंग स्टेशन' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune-Delhi flight landed by Passenger Pilot