आता वाळू तस्करांची काही खैर नाही

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

वाळू चोरीचे प्रकार आढळून येणाऱ्या भागात सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग आढळून आल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात यावी, अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी राम यांनी दिल्या. 

पुणे : वाळू चोरीस आळा घालण्यासाठी महसूल आणि पोलिस विभागाच्यावतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. यापुढील काळात वाळू चोरीचा प्रकार निदर्शनास आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हवेली आणि शिरुर तालुक्‍यातील वाळू चोरी रोखण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी (ता. 15) जिल्हाधिकारी राम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. शिरुरचे आमदार अशोक पवार, पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख आदी या वेळी उपस्थित होते.

पुणे : चोरटा गेला 'एमएसईबी'च्या पट्ट्या चोरायला अन् बसला शॉक 

जिल्हाधिकारी राम म्हणाले, ''ज्या गावात वारंवार वाळू चोरीचे प्रकार घडत आहेत, अशा गावांची आणि वाळू चोरी करणाऱ्यांच्या नावांची यादी तयार करावी. पोलिस ठाणेनिहाय भरारी पथके तयार करावीत. तसेच, तपासणीसाठी चेकपोस्ट तयार करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी राम यांनी अधिकाऱ्यांना दिले.

माळशेजचा पतंग महोत्सव अडकला वादाच्या भोवऱ्यात कारण.... 

तर अधिकाऱ्यांवरही कारवाई होणार
वाळू चोरीचे प्रकार आढळून येणाऱ्या भागात सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग आढळून आल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात यावी, अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी राम यांनी दिल्या. 

पक्ष बदललाय... आता तुम्हीही बदला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune District Collector warns of tough action on sand smuggling