
Pune Drone Show on PM Modi Birthday Sparks Controversy Opposition Slams Crores Spent for 25 Minute Event
पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ड्रोन शोचं आयोजन स. प. महाविद्यालयाच्या मैदानात आयोजित करण्यात आलं होतं. बुधवारी १७ सप्टेंबर रोजी झालेल्या या ड्रोन शोच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देण्यात आल्या. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ वर्षात घेतलेले निर्णय ड्रोन शोच्या माध्यमातून दाखवले गेले. दरम्यान, या ड्रोन शोच्या खर्चावरून शिवसेना ठाकरे गटाच्या वसंत मोरे यांनी टीका केलीय.