मधुमेहातील अंधत्वावर त्रिसूत्री आवश्‍यक

मुक्तांगण विद्यालय, सहकारनगर - ‘पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान’तर्फे प्रतापराव पवार आणि डॉ. के. एच. संचेती यांच्या हस्ते ‘पुणे नेत्रसेवा राष्ट्रीय पुरस्कार’ डॉ. नामपेरुमलस्वामी यांना रविवारी प्रदान करण्यात आला. त्या वेळी (डावीकडून) डॉ. सतीश देसाई, डॉ. संचेती,
मुक्तांगण विद्यालय, सहकारनगर - ‘पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान’तर्फे प्रतापराव पवार आणि डॉ. के. एच. संचेती यांच्या हस्ते ‘पुणे नेत्रसेवा राष्ट्रीय पुरस्कार’ डॉ. नामपेरुमलस्वामी यांना रविवारी प्रदान करण्यात आला. त्या वेळी (डावीकडून) डॉ. सतीश देसाई, डॉ. संचेती,

पुणे - मधुमेहामुळे येणाऱ्या अंधत्वाला प्रतिबंध करण्याचे सर्वांत मोठे आव्हान देशाच्या आरोग्य क्षेत्रापुढे आहे. लवकर अचूक निदान, प्रभावी उपचार आणि त्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाची मदत या त्रिसूत्रीने मोठ्या संख्येने येणारे अंधत्व आपण नियंत्रित करू शकतो, असा विश्‍वास राष्ट्रीय पातळीवर दिग्गज नेत्रतज्ज्ञांनी रविवारी येथे व्यक्त केला.

राष्ट्रीय स्तरावर नेत्रसेवेत भरीव योगदान देणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेला ‘पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान’तर्फे ‘पुणे नेत्रसेवा राष्ट्रीय पुरस्कार’ने गौरविण्यात येते. यंदाचा हा पुरस्कार मदुराई येथील ‘अरविंद आय केअर सिस्टिम’ या संस्थेस प्रदान करण्यात आला. 

संस्थेचे आजीवन कार्याध्यक्ष डॉ. नामपेरुमलस्वामी यांनी ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार आणि ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. त्यानिमित्ताने डॉ. नामपेरुमलस्वामी आणि भारतीय नेत्रतज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. एस. नटराजन या दोघांनी देशासमोरील नेत्रआरोग्याची आव्हाने आणि त्यावरचे उपाय सांगितले. या वेळी ‘पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान’चे अध्यक्ष डॉ. मधुसूदन झंवर, कार्याध्यक्ष डॉ. सतीश देसाई, सचिव राजेश पवार आणि डॉ. संपत पुंगलिया या वेळी उपस्थित होते. 

डॉ. नामपेरुमलस्वामी म्हणाले, ‘‘मधुमेहाला प्रतिबंध करता येऊ शकत नाही; पण त्यातून येणारे अंधत्व हे नक्की रोखता येते. त्यासाठी नेत्रतपासणीचे मोठे जाळे निर्माण करण्यावर भर देणे आवश्‍यक आहे. त्यातून मधुमेहामुळे नेत्रपटलावर होणाऱ्या दुष्परिणामांचे निदान होऊन भविष्यातील गुंतागुंत टाळता येते.’’

डॉ. नटराजन म्हणाले, ‘‘मधुमेह हे देशातील अंधत्वाचे मुख कारण आहे. नेत्रउपचारांच्या सुविधा देशातील शहरी भागांमध्ये केंद्रित झाल्या आहेत; पण आधुनिक उपकरणांच्या माध्यमातून उपचारांच्या या सुविधा ग्रामीण भागातील रुग्णांपर्यंत पोचवण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.’’

पवार म्हणाले, ‘‘समाजासाठी सातत्याने योगदान देणे हा पुण्याच्या संस्कृतीचा भाग आहे. पुण्यात अपंगांसाठी कार्य करणाऱ्या सुमारे ८५ संस्था आहेत. त्यातील बहुतांश संस्था महिलांच्या नेतृत्वाखाली सुरू आहेत.’’ 

डॉ. संचेती यांचेही भाषण झाले. डॉ. देसाई यांनी प्रास्ताविक केले. डॉ. झंवर यांनी प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती दिली. डॉ. आरती काबरा यांनी सूत्रसंचालक केले; तर, डॉ. सुवर्णा गोलेचा यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com