Video : पुण्यातील मिरवणूक तीन तास लवकर 'उरकली'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

पोलिसांनी स्पीकर बंद केल्यामुळे तसेच मंडळांना गतीने मिरवणूक पुढे नेण्याचे आवाहन केल्याने, सकाळी सव्वा दहाच्या सुमारास टिळक चौकातून सर्व मंडळ मार्गस्थ झाली होती. 

पुणे : वैभवशाली परंपरा असलेली पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक यावर्षी तब्बल तीन तास लवकर संपली. शुक्रवारी सकाळी सहा वाजता पुन्हा सुरू झालेली मिरवणूक नऊच्या सुमारास मंदावली होती. मात्र पोलिसांनी स्पीकर बंद केल्यामुळे तसेच मंडळांना गतीने मिरवणूक पुढे नेण्याचे आवाहन केल्याने, सकाळी सव्वा दहाच्या सुमारास टिळक चौकातून सर्व मंडळ मार्गस्थ झाली होती. 

Video : पुण्यातील टिळक चौक रिकामा; मिरवणूक संपली

त्यानंतर साडेदहा वाजता पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल तीन तास आधी मिरवणूक संपल्याचे जाहीर केले. मंडळांनी केलेले सहकार्य आणि पोलिसांनी नियोजनात केलेल्या बदलामुळे या वर्षी लवकर मिरवणूक संपल्याचे त्यांनी सांगितले.

Video : 'पुढच्या वर्षी लवकर या' म्हणत पुण्यातील बाप्पांना निरोप!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune ganpati immersion rally finish quickly