दख्खनची राणी झाली ९२ वर्षाची!

पुण्यात प्रवाशांनी एकत्र येत साजरा केला वाढदिवस
Deccan Queen
Deccan QueenSakal

पुणे : ‘‘डेक्कन क्विनचा वेग ताशी ३०० किलोमीटर केला आणि विनाथांबा ती धावल्यास अवघ्या दीड तासांत पुण्याहून मुंबईला पोचेल. त्यामुळे दिवसातून किमान दोन वेळा ही गाडी पुणे- मुंबई प्रवास करू शकेल...अन हे शक्य आहे..’’ या मागणीचा पाठपुरावा पुणे रेल्वे स्‍टेशनचे संचालक सुरेश जैन यांच्यासमोर केला तो रेल्वे प्रवासी ग्रूपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी. निमित्त होते ते डेक्कन क्विन अर्थात दख्खनच्या राणीच्या वाढदिवसाचे. नेहमीच्या प्रवाशांनी एकत्र येत पुणे रेल्वे स्टेशनवर हा वाढदिवस साजरा केला. (Pune-Mumbai Route The Deccan Queen become 92 year old)

पुणे- मुंबई मार्गावर धावणाऱ्या डेक्कन क्विन या लोकप्रिय रेल्वेगाडीने मंगळवारी ९२ व्या वर्षात पदार्पण केले. त्या निमित्ताने पुणे रेल्वे स्थानकावर केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी जैन, स्टेशन व्यवस्थापक अजयसिंग, पोलिस निरीक्षक मुरली आदी उपस्थित होते. रेल्वे प्रवासी ग्रूपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. सर्वात जुन्या पंजाब मेलला ११० वर्षे पूर्ण झाल्याबद्दलही या प्रसंगी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.

Deccan Queen
पुण्यात शिल्लक ऑक्सिजनही उद्योगांना मिळेना!

मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या रेणू शर्मा यांनीही ऑनलाईन पद्धतीने या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. डेक्कन क्विनने नेहमी प्रवास करणारे प्रवासीही आवर्जुन या वाढदिवसासाठी आले होते. रेल्वे अधिकाऱ्यांनी शुभेच्छा देतानाच, सलग तीस वर्षे डेक्कन क्विनचा वाढदिवस साजरा करणाऱ्या हर्षा शहा यांचेही कौतुक करीत होते.

डेक्कन क्विन पुण्यातून सकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी सुटते आणि सकाळी १० वाजून ४० मिनिटांनी मुंबईला पोचते. तर, मुंबईहून सायंकाळी ५ वाजून १० मिनिटांनी सुटते आणि रात्री ८ वाजून ३० मिनिटांनी पुण्यात पोचते. कोरोनामुळे सध्या ही गाडी बंद ठेवण्यात आली आहे. सुमारे १५ दिवसांत मुंबई- पुणे मार्गावरील वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता आहे. डेक्कन क्विन सुरू होईल तेव्हा तिला १७ डबे असतील आणि नव्या रूपात ती धावेल, अशी माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.

Deccan Queen
बारामती : राष्ट्रवादीच्या झेडपी सदस्यांच्या पतीवर हल्ला; पोलिस अॅक्शन मोडमध्ये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com