Nepal Unrest Traps Indian Tourists Maharashtra Govt Plans Evacuation
Esakal
पुणे
नेपाळमध्ये मुंबई-पुण्यातील पर्यटक अडकले, २१ ज्येष्ठ नागरिकांचा समावेश; सुटकेसाठी सरकारकडे विनंती
Nepal Violence : भारतातून पर्यटनाला गेलेले अनेक पर्यटक नेपाळमध्ये अडकून पडले आहेत. यामध्ये पुणे-मुंबईतील अनेक जणांचा समावेश आहे. पुणे-मुंबईतून २३ जण नेपाळमध्ये पर्यटनाला गेले होते.
नेपाळमध्ये गेल्या आठवड्याभरापासून आंदोलनामुळे राजकीय अस्थिरता निर्माण झालीय. आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणानंतर देशात जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना घडतायत. यातच पंतप्रधान केपी ओली यांनी राजीनामा देत देशातून पलायन केलंय. तर अनेक मंत्र्यांची घरं जाळण्यात आली आहेत. अशा स्थितीत भारतातून पर्यटनाला गेलेले अनेक पर्यटक नेपाळमध्ये अडकून पडले आहेत. यामध्ये पुणे-मुंबईतील अनेक जणांचा समावेश आहे. पुणे-मुंबईतून २३ जण नेपाळमध्ये पर्यटनाला गेले होते. विमान रद्द झाल्यानं ते आता हॉटेलमध्येच अडकले आहेत. त्यांनी मदतीसाठी भारत सरकारकडे विनंती केलीय.

