पुणे महापालिका दवाखान्यांत १० हजार खाटा बसतील एवढी जागा आहे पडून

Oxygen-Bed
Oxygen-Bed

पुणे - महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमधील काही लाख चौरस फूट जागा वापराविना पडून आहे. नियोजन करून ही जागा वापरात आणली, तर साथरोगच्या काळात एकाच वेळी आठ ते दहा हजार रुग्णांवर उपचार करण्याची सुविधा उभी होऊ शकते. ती ही केवळ दीडशे ते दोनशे कोटी रुपयांमध्ये. मात्र, ते करण्याऐवजी सल्लागार नेमण्यावर आणि त्याच्याकडून आराखडा तयार करण्यावर प्रशासनाकडून का भर दिला जात आहे, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यापूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेली ही पायाभूत सुविधा पूर्ण क्षमतेने वापरली जात नाही. ती जागा धूळखात पडून आहे. खरे तर स्वाईन फ्लू नंतर तरी ही पायाभूत सुविधांवर थोडाफार खर्च करून उपयोगात आणली असती, तर आज कोरोनाच्या काळात महापालिकेच्या मदतीला ती येऊ शकली असती. 

परंतु पुणेकरांना आरोग्याच्या सुविधा देण्यासाठी अस्तित्वात आसलेल्या आरोग्यासाठीच्या पायाभूत सुविधा पूर्ण क्षमतेने वापर करण्याची राजकीय आणि प्रशासकीय प्रखर इच्छाशक्ती नाही. कोरोनाचा झटका बसल्यानंतरही ही इच्छाशक्ती दाखविण्याची सत्ताधारी आणि प्रशासनाची नाही, हे पुढील वर्षीच्या (२०२१-२२) अंदाजपत्रकातील तरतुदीवर पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. 

महापालिका प्रशासनाने स्थायी समितीला सादर केलेल्या अर्थसंकल्पात आरोग्यासाठी ५७४ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यापैकी साडेतीनशे कोटी रुपये महसुली खर्चासाठी आहे. त्यातील प्रामुख्याने खर्च वेतनावर होतो. तर, उर्वरित सुमारे २२४ कोटी रुपये महसुली खर्च आहे. त्यात आरोग्याच्या विविध योजनांचा समावेश आहे. मात्र, महापालिकेची कोणत्याही साथरोगासाठी उपयुक्त ठरतील अशा दृष्टीने महापालिकेची रुग्णालये सक्षम करण्याचा कोणताही विचार यात नाही. त्यामुळे ही स्थायी समितीने या दृष्टीने अंदाजपत्रकात तरतूद करण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.

महापालिकेची ७१ रुग्णालये आणि बाह्य रुग्ण विभागाचे जाळे शहरात आहे. त्यापैकी कमला नेहरू, लायगुडे आणि राजीव गांधी अशी काही प्रमुख रुग्णालये आहेत. त्याचा सद्यःस्थिती पूर्ण क्षमतेने वापर होत नाही. या आणि अशा काही प्रमुख रुग्णालयांमधील काही लाख चौरस फूट जागा वापराविना धूळखात पडून आहे. शहराची गरज लक्षात घेऊन या रुग्णालयांमध्ये अतिदक्षता विभाग, ऑक्सिजन बेडची सुविधा अशा सुविधा होऊ शकते. त्यासाठी फार मोठा खर्च अपेक्षित नाही. नियोजन करून तो केला, तर आठ ते दहा हजार खाटा उपलब्ध होऊ शकतात. 

कसे करता येईल?
- हे करण्यासाठी हजारो कोटी रुपयांची गुंतवणुकीची गरज नाही. केवळ दिडशे ते दोनशे कोटी रुपयांची गरज आहे
- महापालिकेकडे पायाभूत सुविधा आहेत. त्या भक्कम करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या मदतीने आराखडा तयार करून तातडीने काम सुरू  
करणे.
- शहरातील पाच रुग्णालये अद्ययावत सुसज्ज करण्यासाठी दोनशे कोटी रुपयांची तरतूद करणे आवश्यक

समस्या काय आहेत?

  • अतिदक्षता विभाग नाही
  • औषध वितरणासाठी ऑनलाइन व्यवस्थेचा अभाव
  • भविष्यातील सोथरोग उद्रेकासाठी पायाभूत सुविधा अपुऱ्या
  • कुशल, अर्धकुशल आणि अकुशल मनुष्यबळाची कमतरता
  • सध्या महापालिकेची हजार ते बाराशे खाटांची व्यवस्था 

काय करता येईल?

  • महापालिकेच्या रुग्णालयांचा चेहरा-मोहरा एका वर्षात बदलणार नाही, त्यासाठी दोन ते तीन वर्षांचा निश्चित आराखडा आवश्यक
  • छोट्यातील छोट्या उपकरणापासून ते अद्ययावत निदान तंत्रापर्यंत आरोग्य यंत्रणा सक्षम करणे
  • सेंट्रल ऑक्सिजन प्लांट उभारणे अतिदक्षता विभाग सुरू करणे
  • यातून खाटांची संख्या ८ ते १० हजारांपर्यंत वाढविणे

कोरोनाच्या काळात रुग्णांना दाखल करण्यासाठी खासगी रुग्णालयांच्या दारात रांगा लागल्या होत्या. भविष्यात ही स्थिती पुन्हा निर्माण होणार नाही, यासाठी महापालिकेने आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी आर्थिक तरतूद करणे आवश्यक आहे.
- सागर वैद्य, नागरिक

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com