पुणे जिल्ह्यातील ग्रामसेवकांचा 1 नोव्हेंबरपासून असहकार

संतोष आटोळे
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

संबंधित विभागाकडून मागण्यांबाबत आदेशही देण्यात आले, मात्र त्यांची अंमलबजावणी होत नाही. यासह सन 2014 पासुन जागा रिक्त असतानाही पदोनत्ती केलेली नाही.

शिर्सुफळ (ता.बारामती) : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन जिल्हा शाखा पुणे यांच्या वतीने आपल्या विविध प्रलंबित मागण्यांच्या अंमलबजावणी बाबत 1 नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील सर्व ग्रामसवेक असहकार आंदोलन करणार आहेत.याबाबतचे निवेदन संबंधित विभागांसह जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते यांना देण्यात आले.

याबाबत युनियनचे पुणे विभागीय अध्यक्ष अमोल घोळवे, जिल्हा मानद अध्यक्ष बाळासाहेब गावडे, जिल्हा सरचिटणीस संदीप ठवाळ, कोषाध्यक्ष क्षीकांत वाव्हळ यांनी दिले निवेदनारुप ग्रामसेवकांच्या विविध मागण्यांसाठी अनेक वेळा आंदोलने करण्यात आली. यावर संबंधित विभागाकडून त्या मागण्यांबाबत आदेशही देण्यात आले, मात्र त्यांची अंमलबजावणी होत नाही. यासह सन 2014 पासुन जागा रिक्त असतानाही पदोनत्ती केलेली नाही.

आदिवासी भागांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासन निर्णयाप्रमाणे एकस्तर वेतन श्रेणी जिल्हा परिषद स्तरावरुन मंजुर होऊन ही तालुका स्थरावर कार्यवाही होत नाही. यामुळे खेड आंबेगाव जुन्नर या तालुक्यांतील आदिवासी भागातील कर्मचारी या लाभापासुन वंचित राहत आहेत. सन 2005 नंतर सेवेत दाखल झालेल्या जिल्ह्यातील 450 पेक्षा जास्त ग्रामसेवकाच्या अंशदान पेंशन योजनेच्या बाबत जिल्हा परिषदेच्या अर्थविभागाकडुन कार्यवाही होत नाही. प्रशासनाने केलेली नाही. तसेच 6 व्या वेतन आयोग फरक रक्कमा खात्यावर जमा झालेल्या नाहीत. या बाबतीत त्वरित निर्णय न घेतल्यास 1 नोव्हेबर पासुन संपुर्ण जिल्हात असहकार आंदोलन करण्यात येणार आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: pune news gramsevak non cooperation movement