हडपसरवासीयांकडून महापौरांना कचरा भेट

महापालिका भवनः स्थानिक नागरिकांचा तिव्र विरोध डावलून हडपसर औद्योगिक वसाहतीमध्ये महापालिकेने हुकुमशाहिने पध्दतीने नवीन कचरा प्रकल्पाचे काम सुरू केले आहे. याच्या निषेधार्थ हडपसर वासियांच्या वतीने महापौर मुक्ता टिळक यांना कचरा भेट देण्यात आला
महापालिका भवनः स्थानिक नागरिकांचा तिव्र विरोध डावलून हडपसर औद्योगिक वसाहतीमध्ये महापालिकेने हुकुमशाहिने पध्दतीने नवीन कचरा प्रकल्पाचे काम सुरू केले आहे. याच्या निषेधार्थ हडपसर वासियांच्या वतीने महापौर मुक्ता टिळक यांना कचरा भेट देण्यात आला

हडपसर (पुणे): स्थानिक नागरिकांचा तिव्र विरोध डावलून हडपसर औद्योगिक वसाहतीमध्ये महापालिकेने हुकुमशाहिने पध्दतीने नवीन कचरा प्रकल्पाचे काम सुरू केले आहे. याच्या निषेधार्थ हडपसरवासीयांच्या वतीने महापौर मुक्ता टिळक यांना कचरा भेट देण्यात आला. तसेच दडपशाही केल्यास हडपसर येथील अजिंक्य व रोकेम हे दोन्ही प्रकल्प बंद पाडले जातील. स्थानिकांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता, नवीन प्रकल्पाचे काम थांबवा. अन्यथा वाईट परिणाम होतील असा निर्वानीचा इशारा नागरिक व नगरसेवकांनी दिला.

हडपसर नागरिकांच्यावतीने महापौरांना कचरा भेट देवून चर्चा करणा-या शिष्टमंडळामध्ये हडपसर प्रभाग समिती अध्यक्ष योगेश ससाणे, नगरसेवक अशोक कांबळे, भैय्या जाधव, महेंद्र पठारे, पप्पू ससाणे, विजय ससाणे, हडपसर-रामटेकडी कचरा प्रकल्प विरोधी समितीचे सदस्य मुकेश वाडकर, सचिन ससाणे, विजय ससाणे, प्रकाश ससाणे, अप्पा गरड यांचा समावेश होता. नवीन प्रकल्पाचे काम त्वरित बंद करावे. शहराचा सर्व कचरा हडपसरच्या माथी न मारता पुणे शहराच्या चारही दिशेला कचरा प्रकल्प चालू करावेत. सर्व चांगले प्रकल्प पश्चीम भागात तर नको असलेले सर्व प्रकल्प पूर्व भागात आणून अन्याय का केला जात आहे ? असा खडा सवाल नागरिकांच्यावतीने महापौरांना विचारण्यात आला.

नगरसेवक ससाणे म्हणाले, 'अनेक वेळा विनंती पत्रे दिली. आंदोलने केली. चर्चा केली. मात्र महापालिकेतील सत्ताधारी हुकमशाहीने हा प्रकल्प हडपसर नागरिकांच्या माथी मारत आहेत. सदाशिव पेठ व नारायण पेठ येथे महापालिकेने जागा सुचवावी ती जागा लोकप्रतीनिधी या नात्याने मी व हडपसर खरेदी करून महापालिकेला देईल. तेथे शहरातील कचरा जिरवावा. हडपसर मधील कचरा जिरविण्यासाठी सध्याचे आजिंक्य, रोकेम हे दोन कचरा प्रकल्प प्रक्रिया पुरेसे आहेत. हडपसर नागरिकांचा सत्ताधा-यांनी अंत पाहू नये. आजपर्यंत केवळ आंदोलन केली. कचरा गाडया आडवल्या. मात्र सदनशीर मार्गाचा पालिका विचार करणार नसेल तर यापुढे कचरा गाडया देखील फोडल्या जातील.'

नगरसेवक कांबळे म्हणाले, 'नवीन कोणताही प्रकल्प आम्ही हडपसरमध्ये चालू होऊ देणार नाही. पण प्रस्तावित कचरा प्रकल्पाचे बांधकाम चालू ठेवल्यास येथील सुरू असलेले सर्व कचरा प्रकीया प्रकल्प देखील आम्ही बंद पाडू.'

महापौर टिळक म्हणाल्या, 'लवकरच हडपसर नागरिक, आंदोलक यांच्या समवेत आयुक्तांची बैठक घेतली जाईल. त्यानंतर नागरिकांच्या हिताच्या दृष्टिने नवीन प्रकल्पाबाबत निर्णय घेण्यात येईल. मात्र आंदोलकांनी चर्चा नको तर नवीन प्रकल्पाचे काम बंद करा नंतरच चर्चा करू अशी भूमिका घेतली.'

महापौरांच्या कर्मचा-याने व महापौरांच्या एका कार्यकर्त्यांने आंदोलकांनी महापौरांना भेट देण्यासाठी नेलेल्या कच-याचे डबे हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आंदोलक व योगेश ससाणे कर्मचारी व कार्यकर्त्यांवर चिडले. वातावरण तापल्यानंतर महापौरांनी आंदोलकांची माफी मागीतली. यावेळी भाजपचे नगरसेवक लायगुडे राज मुरलीधर यानी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही ससाणे यांनी लोकशाही पध्दतीने चर्चा सुरू असताना लुडबूड करू नका असे बोल सुनावले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com