जुन्नर बाजार समितीत गैरव्यवहार : माजी सभापतींसह दोघांवर गुन्हा दाखल

जुन्नर
जुन्नर

जुन्नर : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव (ता. जुन्नर) येथील जमिनीच्या मुरूम उत्खननात 38 लाख 74 हजार रुपये 80 रुपयांचा गैरव्यवहार झाला असल्याचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे (ग्रामीण) यांनी केलेल्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी खेड येथील सहकारी संस्थेचे सहायक निबंधक श्रीकांत श्रीखंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नारायणगाव पोलिसांनी बाजार समितीचे माजी सभापती रघुनाथ आबाजी लेंडे व दिनकर कारभारी कुतळ यांच्यावर बुधवारी (ता. 11) रात्री गुन्हा दाखल केला आहे. या मुळे सहकार क्षेत्रातील मोठा गैरव्यवहार उघड झाला आहे.

या बाबत माहिती अशी की, सप्टेंबर 2015 मध्ये झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत लेंडे व आशा बुचके यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने सभापती संजय काळे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलचा पराभव करून सत्ता हस्तगत केली होती. 3 ऑक्टोबर 2015 रोजी लेंडे यांची सभापतीपदी तर शिवसेनेचे दिलीप डुंबरे यांची उपसभापती निवड झाली होती. सभापती लेंडे यांनी स. नं. 98/3 मधील बाजार समितीच्या जमिनीतील 49 हजार 248 ब्रास मुरुमाची विक्री 140 रुपये ब्रास या दराने मोन्टो कार्लो कंपनीला केली होती.

मान्टो कार्लो कंपनीने येथील पुणे नाशिक महामार्गाच्या भरावासाठी मुरूमाचा वापर केला. कंपनीने 21 हजार 576 ब्रास मुरूमाची 30 लाख 51 हजार 720 रू. ची रक्कम बाजार समितीच्या खात्यात जमा केली. उर्वरित 27 हजार 672 ब्रास मूरुमाची 38 लाख 74 हजार 80 रुपयांची रक्कम लेंडे यांच्या सुचने वरून कंपनीचे व्यवस्थापक निर्मल पांडे यांनी बेकायदेशीर रित्या कुतळ यांच्या बॅक खात्यात RTGS ने जमा केली होती. या बाबतचे प्रतिज्ञापत्र पांडे यांनी बाजार समितीला सादर केले होते.

दरम्यान लेंडे यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर झाला. 6 जून 2017 रोजी सभापतिपदी संजय काळे यांची निवड झाली. 28 जुलै 2017 रोजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी जिल्हा उपनिबंक यांच्याकडे तक्रार अर्ज देऊन चौकशीची मागणी केली होती. 31ऑग. 2027 रोजी चौकशी समितीने आहवाल सादर करून लेंडे यांनी कुतळ यांच्या मदतीने पदाचा गैरवापर करून 38 लाख 74 हजार 80 रुपयांचा अपहार केल्याचा ठपका ठेवला. या प्रकरणी सहायक निबंधक श्रीखंडे यांच्या फिर्यादीवरून बूधवारी रात्री भादवी कलम 166, 167, 409, 420, 465, 466, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी दिली. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com