जुन्नरमध्ये दोन बिबट्यांच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार

दत्ता म्हसकर
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

उसाच्या शेतातून अचानक दोन बिबटे आले व त्यांनी शेळ्यांवर हल्ला केला. आरडाओरडा केल्याने बिबटे पळून गेले.

जुन्नर : तालुक्यातील आपटाळे येथे दोन बिबट्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या दोन शेळ्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती वनपाल सोनवणे यांनी दिली.

राळेगण पाठोपाठ सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या आपटाळे येथे बिबट्याने पाळीव प्राण्यावर हल्ला केल्याची घटना घडली यामुळे परिसरात भीतीचे वातावरण असून बिबट्याला पकडण्याची मागणी करण्यात आली आहे.

सोनवणे यांनी सांगितले की, आशा दत्तात्रेय कोल्हाळ ह्या रविवार (दि. 22) रोजी रानात शेळ्या घेऊन गेल्या होत्या. सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास गावा जवळील पिराचे मंदिराजवळ आल्या असता जवळच्या मिनानाथ देवाडे यांच्या उसाच्या शेतातून अचानक दोन बिबटे आले व त्यांनी शेळ्यांवर हल्ला केला. आरडाओरडा केल्याने बिबटे पळून गेले. जाताना एका पाळीव गायीच्या पाठीवर एका बिबट्याने पंजा मारला. जखमी शेळ्या घरी आणल्या यापैकी एक शेळी रात्री तर दुसरी सोमवारी पहाटे मरण पावली.यात कोल्हाळ यांचे 17 हजाराचे नुकसान झाले आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

 

 

Web Title: pune news junnar leopards kills goats