पुण्यात 'मूक' मोर्चाची 'घोषणामय' रॅली !

स्वप्नील जोगी
रविवार, 6 ऑगस्ट 2017

पुणे : कोपर्डी घटनेतील निर्भयाच्या मारेकऱ्यांना फाशी व्हावी, मराठ्यांना नोकरी व शिक्षणात आरक्षण मिळावे, ऍट्रॉसिटी कायद्यात सुधारणा व्हावी अशा विविध मागण्यांसाठी गेल्या वर्षभरात निघालेल्या विविध मराठा क्रांती मूक मोर्चांच्याच पार्श्‍वभूमीवर येत्या 9 ऑगस्टला मुंबई येथे होऊ घातलेल्या मराठा क्रांती मूक मोर्चासाठी पुण्यात रविवारी दुचाक्‍यांची जनजागृती रॅली काढण्यात आली. फरक फक्त एवढाच की, मोर्चांप्रमाणे ही रॅली "मूक' नव्हती; तर रॅलीदरम्यान अनेकदा मोठमोठ्याने घोषणा दिल्या जात होत्या. 

"जय भवानी, जय शिवाजी,' "एक मराठा, लाख मराठा' अशा विविध घोषणा देत सुमारे चार-पाचशे दुचाकीस्वार सकाळी 11 च्या सुमारास मार्केटयार्ड (गुलटेकडी) येथून निघाले आणि पुढे विविध ठिकाणी त्यांना इतर दुचाकीस्वार येऊन मिळत असल्याचे पाहायला मिळाले. संपूर्ण रॅलीत मिळून सुमारे 2 हजार दुचाक्‍यांवरून तीन ते चार हजार जण सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. तरुणी आणि महिलांची संख्याही लक्षणीय होती. रॅलीत सहभागी जणांनी हातांत शिवरायांची रेखाचित्र असलेले भगवे झेंडे घेतले होते. तसेच अनेकांनी भगव्या टोप्याही परिधान केल्या होत्या. 

रॅलीच्या सोबत पोलिसांच्या जीप आणि एक व्हॅन सुद्धा पाहायला मिळाली. शिवाय, सोबतीने एक रुग्णवाहिका देखील होती. शहरात ठिकठिकाणी पोलिस आणि वाहतूक पोलिसांची चोख व्यवस्था ठेवण्यात आल्यामुळे एखाददोन ठिकाणे सोडता फारशी वाहतूक कोंडी झाली नाही. बाबा भिडे पुलाजवळील नदीपात्रात (डेक्कन) दुपारी दीड वाजता रॅलीची सांगता झाली. 

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: Pune news Maratha Kranti Morcha rally in Pune