'बालचित्रवाणी' बंद; 'ई बालभारती'स सुरू करणार

शीतलकुमार कांबळे
बुधवार, 31 मे 2017

केंद्र सरकारने महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये बालचित्रवाणीची स्थापना केली. मनोरंजनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देणे हा या संस्थेचा महत्त्वाचा उद्देश होता. विविध शाळांमध्ये बालचित्रवाणीचे कार्यक्रम विद्यार्थ्यांना दाखविण्यात येत होते. विद्यार्थ्यांची जिज्ञासा वाढवणाऱ्या अनेक कार्यक्रमाची निर्मिती बालचित्रवाणीकडून केली
जात होती.

सोलापूर : विधी व न्याय विभाग व वित्त विभागाच्या सूचनेनुसार तसेच नियामक मंडळाच्या झालेल्या बैठकीत 'बालचित्रवाणी' बंद करण्याचा निर्णय झाला होता. शासनाच्या या निर्णयास मान्यता देण्यात आली असून ई बालभारती ही संस्था नव्याने स्थापन करण्यात येणार आहे.

बालचित्रवाणी ही संस्था आर्थिकदृष्ट्या अडचणीत होती. संस्थेतील कर्मचाऱ्यांचे वेतन व दैनंदिन खर्च भागवण्यासाठी सुद्धा रक्कम शिल्लक नसायची. या संस्थेत 50 पेक्षा कमी कामगार असल्याने, आणि ही संस्था उद्योग या संज्ञेत येत असल्याने ती बंद करण्याचा शासन निर्णय घेण्यात आला आहे. संस्थेतील कार्यरत कर्मचाऱ्यांना औद्योगिक कलह कायदा, 1947 नुसार एक महिन्याची आगावू नोटीस पे देण्यात येणार आहे. तसेच 31 मे 2017 पासून या कर्मचाऱ्यांना सेवामुक्त करण्यात येणार आहे.

मागील काही वर्षांत बालचित्रवाणीची आर्थिक परिस्थिती खराब झाली होती. निधी अभावी कर्मचाऱ्यांचे महिनोमहिने वेतन न होणे, नवीन यंत्रणांचा अभाव, नवीन कार्यक्रमांची ठप्प झालेली निर्मिती यांमुळे बालचित्रवाणी बंद होणार, अशी चर्चा होती. तसेच शिक्षण विभागाची ही महत्त्वाची संस्था असल्याने शासन बालचित्रवाणी बंद होऊ देणार नाही अशी अपेक्षा बऱ्याच जणांना होती. शासनाच्या या निर्णयाने आता याला पूर्ण विराम मिळाला आहे.

केंद्र सरकारने महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये बालचित्रवाणीची स्थापना केली. मनोरंजनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देणे हा या संस्थेचा महत्त्वाचा उद्देश होता. विविध शाळांमध्ये बालचित्रवाणीचे कार्यक्रम विद्यार्थ्यांना दाखविण्यात येत होते. विद्यार्थ्यांची जिज्ञासा वाढवणाऱ्या अनेक कार्यक्रमाची निर्मिती बालचित्रवाणीकडून केली
जात होती.

सुरवातीला केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडून संस्थेला निधी मिळत होता. स्थापनेनंतर काही वर्षांनी राज्य शासनाने संस्थेची पूर्ण जबाबदारी घ्यायची असा निर्णय झाला होता. त्यानुसार राज्य शासनाने ही जबाबदारी घेतली होती. मात्र फेब्रुवारी 2014 पासून या कार्यक्रमाचे प्रक्षेपण बंद करण्यात आले होते.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेस नेते बाबा सिद्दिकींच्या निवासस्थानी छापे
महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदीसाठी 12 जूनला कर्नाटक बंद
इंदापूरजवळ अपघातात दोन जण ठार
गोवळकोट किल्ल्यावरील तोफांचे पुनर्वसन
काबूलमधील स्फोटात 80 ठार; 300 जखमी

Web Title: Pune News Solapur News Education in Pune balchitravani sakal esakal