पुण्यात दागिने चोरणाऱयाला 24 तासाच्या आत अटक

संदीप जगदाळे
शनिवार, 27 मे 2017

हडपसर (पुणे): बावीस तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरणा-या आरोपीस हडपसर पोलिसांनी २४ तासाच्या आत अटक करून मुद्देमाल जप्त केला. आरोपींना रविवारपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

शुभम अशोक राखपसरे (वय २१, रा. घुले वस्ती, मांजरी) असे अटक करण्यात आलेल्या चोरटयाचे नाव आहे. याबाबत संतोष उत्तम टिळेकर (वय ४० रा. महादेवनगर, मांजरी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली होती.

वरिष्ठ पोलिस निरिक्षक विष्णू पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ मे रोजी पहाटे अडीच वाजता टिळेकर कुटूंबीय घरात झोपले होते. त्यांचे त्याच इमारतीत हार्डेवेअरचे दुकान आहे. पहाटेचा फायदा घेवून चोरटयाने दुस-या मजल्यारील बेडरूमच्या उघडया दरवाजावाटे आत प्रवेश केला. कपाट तोडून कपाटातील वीस तोळे सोन्याचे दागीने चोरले. गोपीनीय माहितीच्या आधारे त्याच दिवशी साडेसात वाजता राखपसरे याला अटक केली. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हायाची कबुली दिली. त्यानंतर घराशेजारीच बंद स्थितीत असलेल्या स्वतःच्या गाडीत लपवून ठेवलेले दागीने जप्त केले.

तपास पथकामध्ये गुन्हे पोलिस निरिक्षक अंजूम बागवान, सहाय्यक पोलिस निरिक्षक संदीप देशमाने, सहाय्यक पोलिस निरिक्षक हेमत पाटील, हवलदार राजेश नवले, युसुफ पठाण, सैदोबा भोजराव, राजू वेंगरे, प्रमोद टिळेकर, प्रताप गायकवाड, विनोद शिवले, गणेश दळवी, नितीन मुंढे, अमित कांबळे, अकबर शेख, दाउद सय्यद यांचा समावेश होता.

ताज्या बातम्याः

Web Title: pune news thief arrested hadapsar police